Saturday, May 18, 2024

Latest Posts

पद्मविभूषण रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहिर

पहिलाच उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. तर द्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना देण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या पार्श्ववभूमीवर या वर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देत त्यांना गौरविण्याचे जाहिर केले आहे. गुरुवारी विधान परिषदेत झालेल्या बैठकीत पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना देण्याचा निर्णय झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कारासोबतच तरुण, महिला आणि मराठी उद्योजकांनाही पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल असे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. तसेच पहिलाच उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. तर द्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना देण्यात येणार आहे. त्यासोबतच गौरी किर्लोस्कर यांना उद्योगिनी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विलास शिंदे यांना उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

या पुरस्कारांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल.
‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असेल. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असणार आहे. तर ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. तसेच‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे असेल.

हा पुरस्कार सोहळा २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वांद्रे -कुर्ला संकुलमधील जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये पार पडणार आहे. तसेच यावेळी या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तर या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यासोबतच उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासोबतच मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा देखील हजेरी लावणार आहेत.

हे ही वाचा:

Nagpur जेलमध्ये कैद्यावरील अत्याचार प्रकरणाला आता आले नवीन वळण

World Photography Day 2023, तुम्हाला माहिती का ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ साजरा करण्यामागचं कारण?

Nagpanchami 2023, नागपंचमीला का पाळले जातात नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती…

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss