Saturday, May 18, 2024

Latest Posts

Nagpanchami 2023, नागपंचमीला का पाळले जातात नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती…

नागपंचमी या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. याच श्रावण महिन्यात सर्व मराठी सणांना सुरवात होते. पण नागपंचमीचा दिवशी अनेक नियम पाळले जातात. काय आहे श्रद्धा चला तर जाणून घेऊयात...

नागपंचमी या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. याच श्रावण महिन्यात सर्व मराठी सणांना सुरवात होते. पण नागपंचमीचा दिवशी अनेक नियम पाळले जातात. काय आहे श्रद्धा चला तर जाणून घेऊयात…

प्राचीन काळापासून चालत आलेल्या या सर्व सणांना विशेष महत्व आहे. २०२३ मध्ये अधिक मास श्रावण महिना सुद्धा आला होता . या अधिक मासातील श्रावणांला खूप महत्व दिले जाते. २०२३ या वर्षातील नागपंचमी २१ ऑगस्ट २०२३ रोजी असणार आहे. या सणाला नागाची पूजा केली जाते. काही स्त्रिया भावाचा दीर्घआयुषसाठी उपवास देखील करतात. या सणाला अनेक नियम देखील पाळले जातात .

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात सापानं देवा प्रमाणे पुजले जाते. नागपंचमी दिवशी त्याने विशेष महत्व दिले गेली आहे. या सणामागे काही प्राचीन काळातील कथा आहेत त्यापैकी आपण एक जाणून घेऊया . एके दिवशी शेतकरी शेत नांगरत असताताना नांगराचा फळाने त्या शेतातील तिने नागिणीची पिल्ले मृत्युमुखी पडली आणि नवदेवतेचा कोप झाला असा समज प्राचीन काळापासून मानला जातो. त्यामुळे या दिवशी शेतात कोणतंही शेतकरी शेत नगरात नाही किंवा शेतीची काम देखील करत नाही. या दिवशी कोणी खान काम करत नाही, घरात भाजा चिरत नाही ,तवा वापरत नाही, व काही सुटायचे देखील नाही असें सर्व नियम पाळले जातात. या दिवशी हे सर्व नियम पाळण्याची प्रथा देखील आहे. काही लोक नाग देवतेची पूजा करून तिला गव्हाच्या खिरीचा नैवेद्य व दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.

नागाचे अन्न दूध लाह्या हे नसेल तरीही सापाला याचा नैवेद्य दाखवला जातो. पावसाळ्याचा महिन्यात हा सण साजरा केला जातो . या काळात पचन शक्ती सुद्धा मंदावलेली असते . या महिन्यात देवाला हलका आहार द्यवा असे मानले जाते. तसेच जेवणातील अन्न उकडून खाल्याने पचनशक्ती सुधारते. त्यामुळे या दिवंशी तवा आणि कढई वापरली जात नाही.

हे ही वाचा:

मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी, राधाकृष्ण विखे पाटील

चंद्राचे सुंदर दृश्य Chandrayaan-3 च्या कॅमेऱ्यात झाले कैद, विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा व्हिडीओ
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss