Monday, December 4, 2023

Latest Posts

अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे : संजय राऊत

अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे : संजय राऊतएकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्यांची औकात काय? असा परखड सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे : संजय राऊतएकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्यांची औकात काय? असा परखड सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला संपवण्याचं भाजपचं स्वप्न आहे, त्यासाठी आमच्या लोकांना फोडून त्यांना आमने-सामने आणलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्यांची औकात काय? बेकायदेशीर पद्धतीनं एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. शिवसेनेला संपवण्याचं भाजपचं स्वप्न आहे, त्यासाठी आमच्या लोकांना फोडून त्यांना आमने-सामने आणलं आहे. त्यांनी ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आमचे काही लोक तोडून नवं सरकार स्थापन केलं आहे. आमच्याच लोकांना आमने-सामने उभं करत मराठी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम भाजपनं केलं आहे.

“मुख्यमंत्री पद गेलं की बार कुठुन उडेल ते कळेल. 31 डिसेंबरनंतर तुमचं मुख्यमंत्रीपद जाऊ देत मग तुम्हाला कळेल तुम्ही कोणत्या बारमध्ये आहात. भाजपच्या गुलामांनी, ज्यांनी मराठी माणसाची बेअब्रू केली आहे, त्यांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. मुंब्य्राला आम्ही गेलो, मुंब्य्राला हजारो शिवसैनिक रस्त्यावर होते. पोलिसांनी अडवलं, तुमच्याकडे सत्ता नसती तर चित्र वेगळं दिसलं असतं, दिवाळी आहे, आम्ही संजय राखला, याचे उपकार मानले पाहिजेत.”, असंही संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

छत्रपती संभाजीनगर शहरात फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना

जिनिलीयाने दोन्ही मुलांना उटणं लावून घातलं अभ्यंगस्नान, व्हिडीओ व्हायरल  

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss