Tuesday, May 7, 2024

Latest Posts

थंडीसाठी घरीच बनवा बहु्गुणी मोरावळा

थंडीच्या महिन्यांना सुरुवात झाली की बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळा उपलब्ध असतो.

थंडीच्या महिन्यांना सुरुवात झाली की बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळा उपलब्ध असतो. केसांच्या आरोग्यासाठी आवळा खूप गुणकारी आहे. दिवसातून एक आवळा खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पण काहींना आवळा तुरट असल्यामुळे खायला आवडत नाही. अश्यावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मोरावळा बनवू शकता. काचेच्या बरणीत भरलेला पिवळट, चॉकलेटी मुरंबा पाहिला की पटकन तोंडात टाकावासा वाटतो. आवळा हा मुळातच पौष्टिक आणि पाचक असतो. त्यात जेव्हा आपण त्याचा मुरंबा किंवा माेरावळा बनवतो, तेव्हा त्याची पौष्टिकता खूप जास्त वाढते. एकदा मोरावळा बनवला की तो वर्षभर चांगला टिकतो. रोज एक चमचा मोरावळा म्हणजे घरच्या घरी तयार केलेले टॉनिक. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी

साहित्य:-

१/२ किलो आवळे
१/२ किलो गूळ
चीमुठभर मीठ
चार-पाच लवंगा
१ ते २ दालचिनीचे तुकडे

कृती:-

सर्वप्रथम मोरावळा बनवण्यासाठी आवळे धूवून ते मिठाच्या पाण्यात चार ते पाच तास भिजवून घ्या. त्यानंतर एका स्वच्छ टॉवेलवर टाकून स्वच्छ पुसून घ्या. मग त्याला काटे चमचाच्या साह्याने सगळ्या साईडने बी पर्यंत टोचून घ्यावे. एका कढईमध्ये गूळ, एक छोटा चमचा पाणी, मीठ, लवंग दालचिनी घालून गुळ विरघळेपर्यंत गॅसवर ठेवून हलवत राहावे. मग त्यामध्ये आवळे घालून मंद गॅसवर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे आवळे शिजू घ्यावे.आवळ्यामुळे पाणी सुटल्यामुळे मिश्रण पातळ होते. ते घट्ट होईपर्यंत मंद गॅसवर ठेवा त्यानंतर छान घट्ट झाले की गॅस बंद करून घ्या. मिश्रण थंड करून बंद काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवावे. हा बहुगुणी आवळा वर्षभर राहतो आणि अतिशय गुणकारीही आहे.

हे ही वाचा:

‘नायक’ चित्रपटाप्रमाणे मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री करा, नंदरकर यांची मागणी

ICC ने T20 World Cup 2024 साठी लाँच केला नवीन लोगो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss