Tuesday, April 23, 2024

Latest Posts

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना खुश करण्यावर सरकारचा भर

यंदाचे अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.

यंदाचे अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी २०२४ ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना खूश करण्यावर सरकारचा मोठा भर असणार आहे. सरकारचे विशेष लक्ष अन्न, घर, नोकऱ्या आणि शेतकरी यांवर असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला जाहीर करणार आहेत.

यंदा जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आणि महागाई रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी अशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या देशाची परिस्थिती लक्षात घेता सरकार मोठी पाऊले उचलण्याची शक्यता आहे. दरवर्षी लाखो तरुण नोकरीच्या शोधात असतात. त्यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, हे अर्थसंकल्पात सरकारसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. १ फेब्रुवारीला काही महत्वाच्या घोषणा केल्या जाणार आहेत. तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी किंवा पीएम-किसान अंतर्गत हस्तांतरित केलेल्या पैशाची रक्कम वार्षिक ६ हजारांवरून ९ हजारांपर्यंत सुमारे ५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम जीडीपीवरहोऊ शकतो पण त्याचा सरकारला फारसा फरक पडणार नाही.

कोविड काळात खाद्यपदार्थाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. डाळी आणि काही खाद्यतेलांच्या किमती वाढल्या होत्या. एलपीजी सिलिंडरची किंमतही एक हजार रुपयांच्या जवळ पोहचली आहे. सरकारने दोन महिन्यांपूर्वी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये कपात केली आहे. मात्र केलेली हा कपात पुरेशी नाही. या किमती आणखीन कमी करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडून रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर दिला जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्प ही यासाठी मोठी संधी ठरू शकते. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हे सरकार समोर मोठे आव्हान आहे. केंद्र सरकराने आता उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी, प्रोडक्शन लिंक्ड इनसेंटिव (PLI) योजनेची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे.

हे ही वाचा:

‘एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील’….किरण मानेनी पोस्ट शेअर करत पुष्करला खडेबोल सुनवलं चमकदार आणि डागरहित त्वचा हवी असेल तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss