Tuesday, April 16, 2024

Latest Posts

आगामी लोकसभा निवडणूका लक्षात घेऊन घोषणा केल्या आहेत – यशोमती ठाकूर

आज देशाचे ( १ फेब्रुवारी ) अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी जाहीर केले.

आज देशाचे ( १ फेब्रुवारी ) अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी जाहीर केले. मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामण यांची अर्थसंकल्प सादर करण्याची सहावी वेळ होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. त्यांनी सादर केलेल्या अर्थांसंकल्पावर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur ) यांनी कडाडून टीका केली आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या अतिशय पावरफुल आहेत, असे मला वाटतं होते. आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना त्या छान घोषणा त्या ठिकाणी करतील अशी अपेक्षा मला होती. मात्र आता या अर्थसंकल्पानंतर असे वाटायला लागले आहे की, त्यांच्याही हातात काहीही राहिलेले नाही. त्यांच्यासमोर जो कागद येतो तो त्या वाचतात. त्याच्या पलीकडे त्यांनाही डोके वापरण्याची मुभा नाही, अश्या शब्दांत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी निर्मला सीतारामण यांच्यावर टीका केली आहे.

आजचा अर्थसंकल्प मोघम स्वरूपाचा झाला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाहिजे त्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र यात प्रत्यक्षात काहीच नाही. केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या अर्थसंकल्पात केले आहे. शेतकऱ्यांना निव्वळ चुना लावण्यात आला आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी कुठेलेही नियोजन यात झालेले नाही. त्याचप्रमाणे बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेले नाहीये. पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव आहे तेवढेच आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. कपाशीचे भाव आज एवढे खाली पडलेली आहे, एवढा कमी भाव याच्या आधी कधीच नव्हता. २००९ मध्ये १० ते ११ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र आता अवघा चार हजारच्या खाली भावा देत आहे. हे बजेट अतिशय फेलिअर असे बजेट आहे. भविष्यासाठी इथे कुठलेही नियोजन नसल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे प्रत्येकाला म्हणत आहेत की, तुम्ही अयोध्येला जा. दर्शन करून घ्या. मात्र आज इथे बजेटमध्ये शून्य आहे. अंगणवाडी ताई साठी या बजेटमध्ये काही नाही, विदर्भासाठी तर काहीच नाही. आज राज्यात आशाताई,आंगणवाडी सेविकांचा प्रश्न ज्वलंत आहे. त्यांच्यासाठी देखील फार काही या बजेट मध्ये नाही. एकंदरीत सर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या दृष्टीने या बजेटमध्ये कुठलीही समाधानकारक कोणतीच गोष्ट या बजेटमध्ये नाही,असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

हे ही वाचा:

आगामी लोकसभा निवडणुकीत कळसाला भगवा फडकवायचा आहे – उद्धव ठाकरे

आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss