Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Union Budget 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, नवीन संसद भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पहिले भाषण, म्हणाल्या…

आता देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प उद्या दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.

आता देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प उद्या दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. उद्या सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा सहावा सर्वसाधारण अर्थसंकल्प असेल. मात्र या अर्थ संकल्पात कोण कोणत्या गोष्टी जाहीर केल्या जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे निकालाआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय घोषणा करणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली आहे. यावेळी नवीन संसद भवनात त्यांनी पहिल्यांदाच भाषण केले आहे. तर आज संसदेच्या संयुक्त अधिवेशनात सरकारच्या कामाची माहिती देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या आहेत की, राम मंदिराच्या उभारणीची आकांक्षा शतकानुशतके होती, जी आज खरी झाली आहे. ते पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याबाबत शंका होत्या, आज त्या इतिहास आहेत. तर संसदेत आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, गेल्या काही वर्षांत जगाने दोन मोठी युद्धे पाहिली आहेत आणि कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना केला आहे. इतके जागतिक संकट असतानाही माझ्या सरकारने देशातील महागाई नियंत्रणात ठेवली आणि सर्वसामान्य भारतीयांचा बोजा वाढू दिला नाही.

 

तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुढे म्हणाल्या आहेत की, आज जगातील एकूण रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांपैकी ४६ टक्के व्यवहार भारतात होतात. गेल्या महिन्यात यूपीआयद्वारे विक्रमी १२०० कोटी व्यवहार झाले. या अंतर्गत १८ लाख कोटी रुपयांचा विक्रमी व्यवहार झाला आहे. तर लोकसभा-राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाल्या आहेत. राष्ट्रपती आपल्या ऐतिहासिक गाडीतून संसदेच्या नवीन इमारतीतून राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024 ची सुरुवात राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली आहे. आता उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

 

हे ही वाचा:

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss