Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Union Budget 2024 : बजेट सादर होण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक…

आता देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.

आता देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. आज सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा सहावा सर्वसाधारण अर्थसंकल्प असेल. मात्र या अर्थ संकल्पात कोण कोणत्या गोष्टी जाहीर केल्या जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे निकालाआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय घोषणा करणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. परंतु आज संपूर्ण दिवसभराचे वेळापत्रक काय आहे हे अनेकांना माहित नाही आहे.

बजेटचे पूर्ण वेळापत्रक काय आहे?

  • अर्थमंत्री सकाळी ११ वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
  • अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रियेचे पालन केले जाईल ज्यामध्ये अर्थमंत्री ९ वाजता त्यांच्या घरातून नॉर्थ ब्लॉकला जातील.
  • अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्या राष्ट्रपतींकडून अर्थसंकल्पाला मंजुरी घेणार आहेत.
  • त्यानंतर १०.१५ मिनिटांच्या सुमारास मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल.
  • यानंतर अर्थमंत्री ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.

तसेच हे निवडणुकीचे वर्ष असल्याने नवीन सरकार स्थापनेपूर्वी तात्पुरती व्यवस्था म्हणून अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो. नवीन सरकार येईपर्यंत हे ‘व्होट ऑन अकाउंट’ सारखे असेल, ज्याद्वारे सरकार आपल्या कमाई आणि खर्चाचे अंदाज सादर करून बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासाठी हा अर्थसंकल्प खूप खास आहे कारण हा त्यांचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प आहे. याआधी तिने २०१९ ते २०२३ दरम्यान ५ पूर्ण बजेट सादर केले होते. मोदी सरकारच्या शेवटच्या कार्यकाळात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. २०१९ च्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना, टॅक्स सूट आणि स्टँडर्ड डिडक्शन अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा अंतरिम बजेटमध्येच केल्या होत्या. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अरुण जेटली यांनी अर्थमंत्रीपद भूषवले आणि २०१४ ते २०१९ या कालावधीत अर्थसंकल्प सादर केला, मात्र त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे पद नंतर पीयूष गोयल यांना देण्यात आले. अशा परिस्थितीत त्यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी मोदी सरकारचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

येथे पाहा Budget Live –

तसेच यंदाचे वर्षाचे बजेट 2024 चे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला टाईम महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनेलसह, फेसबूक, ट्विटर वर थेट बघता येणार आहे.

हे ही वाचा:

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss