Friday, April 19, 2024

Latest Posts

Union Budget 2024 : यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष, थोड्याच वेळात सादर होणार अर्थसंकल्प

आता देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.

Union Budget 2024 : आता देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. आज सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा सहावा सर्वसाधारण अर्थसंकल्प असेल. मात्र या अर्थ संकल्पात कोण कोणत्या गोष्टी जाहीर केल्या जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे निकालाआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय घोषणा करणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज ११ वाजता लोकसभेत केंद्रीय बजेट २०२४ सादर करतील. १९९९ पासून केंद्रीय अर्थसंकल्प दुपारी ११ वाजता सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे. यापूर्वी ते संध्याकाळी 5 वाजता सादर करण्यात येत होते. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७ मध्ये पहिल्यांदा १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर केले होते. तेव्हापासून अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे. महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांसाठी या बजेटमध्ये मोठी घोषणा होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मोदी सरकारच्या २.० मधील या शेवटच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता काही वेळातच अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल. केंद्र सरकार या बजेटमध्ये गरीब, युवा, किसान आणि महिला GYAN वर फोकस करणार आहे. या चार जाती असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यात महिलांची लोकसंख्या अर्धी आहे. महिला वर्गाला भाजपकडे वळविण्यासाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून अधिक लक्ष देत आहे. त्यामुळेच या चार वर्गासाठी बजेटमध्ये खास घोषणा होऊ शकते.

येथे पाहा Budget Live –

तसेच यंदाचे वर्षाचे बजेट 2024 चे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला टाईम महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनेलसह, फेसबूक, ट्विटर वर थेट बघता येणार आहे.

हे ही वाचा:

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss