Sunday, May 19, 2024

Latest Posts

रविवारी तीनही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार, २ एप्रिल रोजी मुंबईत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार, २ एप्रिल रोजी मुंबईत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. मध्य पश्चिम रेल्वेवरील, रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नरल यंत्रणेची देखभाल दुरुस्तीमूळे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारच्या मेगाब्लॉकमूळे अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे आणि ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक वेळापत्रक

ठाणे – कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लक घेण्यात येणार आहे.
सीएसएमटी येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल नियोजित थांब्यासह कलवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवर थांबणार आहेत. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल नियोजित थांब्यासह दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे मेगाब्लॉक वेळापत्रक

पनवेल-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी १०.३३ ते ३.४९ वाजेपर्यत पनवेल-सीएसएमटी अप लोकल आणि सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत सीएसएमटी-पनवेल आणि बेलापूर हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल-ठाणे अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे-पनवेल डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक वेळापत्रक

चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीमध्ये चर्चगेट -मुंबई सेंट्रल स्थानकांवर सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

पोलिसांवर दबाव आणला जातोय, त्यांना चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडले जात आहे – नाना पटोले

नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये 1st April पासून नवीन नियम लागू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss