Monday, May 6, 2024

Latest Posts

पोलिसांवर दबाव आणला जातोय, त्यांना चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडले जात आहे – नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आज ठाण्यात संकल्प सत्याग्रहासाठी आले होते. राहून गांधी यांच संसदीय सदस्यत्व बाद केल्यानंतर संपूर्ण राज्यात आज काँग्रेसच्या वतीने निदर्शने केली जात आहेत. अशातच नाना पाटोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येऊन शिंदेंवर टीका सुद्धा केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आज ठाण्यात संकल्प सत्याग्रहासाठी आले होते. राहून गांधी यांच संसदीय सदस्यत्व बाद केल्यानंतर संपूर्ण राज्यात आज काँग्रेसच्या वतीने निदर्शने केली जात आहेत. अशातच नाना पाटोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येऊन शिंदेंवर टीका सुद्धा केली आहे. ठाणे शहरात सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिलेला नसल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. हे सरकार तातडीने बरखास्त करण्याची मागणी आपण राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते गिरीश कोळी याच्यावर शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्यानंतर पोलिसांनी अद्याप पोलीस स्थानकात गुन्हा दाखल न करून घेतल्यामुळे नाना पटोलेंनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ठाण्यात पोलिसच नव्हे तर, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिलेला नसल्याचं पटोले म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकाचा मृत्यु हा संशयास्पद असल्याचं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे. पोलिसांवर दबाव आणला जातोय आणि त्यांना चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडले जात आहे असं बोलत नाना पटोले यांनी ठाण्यातील पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला आहे.

या पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देशात विरोधी पक्षांना संपवून हुकूमशाही सुरु असल्याचं पटोले म्हणाले. या पत्रकार परिषदेनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या ठाण्यातील नाद बंगला या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

हे ही वाचा : 

ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना करावा लागणार अडचणींना सामना, फक्त ३७% पाणीसाठा

राज्यात कोरोनाचा धुमाकूळ वाढतोय!, रुग्णामध्ये होतेय सातत्याने वाढ

छ. संभाजीनगर पाठोपाठ आता कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान झाली दगडफेक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss