Friday, May 3, 2024

Latest Posts

अँड द नॅशनल अवॉर्ड गोज टू….!

अजय देवगनसोबत तमिळ सुपरस्टार सूर्याला त्याच्या 'सुरुराई पोट्टू' या चित्रपटासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला.

दिल्ली – नवी दिल्ली येथे काल ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या वर्षी 305 चित्रपटांना फीचर फिल्मश्रेणीत नामांकन मिळाले आहे. हे पुरस्कार 2020 या वर्षासाठी देण्यात आले आहेत. यावर्षी फीचर फिल्म ज्युरीचे नेतृत्व चित्रपटनिर्माते विपुल शाह यांनी केले. ज्युरी सदस्य धरम गुलाटी यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. यंदाचा पुरस्कार सोहळा अजय देवगणसाठी खास ठरला असून त्याच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार जाहीर झाला. तसेच याच सिनेमासाठी अजयला सर्वात्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

हेही वाचा

‘रंजना अन्फोल्ड’ अभिनेत्री रंजनाचा रंजक जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अजय देवगणसोबत तमिळ सुपरस्टार सूर्याला त्याच्या ‘सुरुराई पोट्टू’ या चित्रपटासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला. तसेच सुरुराई पोट्टूला सर्वात्कृष्ट फिचर फिल्म हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वात्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जिंकण्याचा बहुमान शांतनू रोडे दिग्दर्शित ‘एक गोष्ट पैठणीची’ या सिनेमाला मिळाला. त्यासोबत राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’साठी सर्वात्कृष्ट गायक, अमोल भावे याला ‘सर्वात्कृष्ट ध्वनी संयोजक’ असे पुरस्कार मिळाले. जून या सिनेमासाठी सिद्धार्थ मेननला विशेष पुरस्कार जाहीर झाला. जेष्ठ अभिनेते किशोर कदम यांना अवांछित आणि गोदाकाठ या चित्रपटांमधील अभिनयासाठी विशेष ज्यूरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

हेही वाचा

धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने द्या, मनसे नेत्यांनी शिवसेनेला डिवचले

 

यावर्षी 500 हुन अधिक फिचर फिल्म्स आणि 150 नॉन फिचर फिल्म्स सर्व चित्रपट 30 वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत. ज्युरींनी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचेही कौतुक केले आहे. चित्रपट निर्माते विपुल शाह यांनी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी 10 सदस्यीय ज्युरीचे नेतृत्व केले. एएनआयच्या मते, ज्युरी सदस्यांमध्ये सिनेमॅटोग्राफर धरम गुलाटी आणि जीएस भास्कर, अभिनेत्री श्रीलेखा मुखर्जी, तसेच ए कार्तिक राजा, व्हीएन आदित्य, विजी थम्पी, संजीव रतन, एस थंगादुराई आणि निशिगंधा यांचा समावेश होता.

Latest Posts

Don't Miss