अभिनेते Ray Stevenson यांनी वयाच्या ५८ वर्षी घेतला अखेरचा श्वास

एस. एस. राजामौलींच्या (S. S. Rajamouli) ऑस्कर विजेत्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील अभिनेते रे स्टीवेन्सन (Ray Stevenson) यांचे निधन झाले आहे.

अभिनेते Ray Stevenson यांनी वयाच्या ५८ वर्षी घेतला अखेरचा श्वास

एस. एस. राजामौलींच्या (S. S. Rajamouli) ऑस्कर विजेत्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमातील अभिनेते रे स्टीवेन्सन (Ray Stevenson) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रे स्टीवेन्सन यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

रे स्टीवेन्सन हे लोकप्रिय अभिनेते असून ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना भारतात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तसेच ‘आरआरआर’ या सिनेमात रे स्टीवेन्सन खलनायकाच्या भूमिकेत होते. या सिनेमात त्यांनी स्कॉट बक्सटनची भूमिका साकारली होती. त्यांची ही नकारात्मक भूमिका भारतीय सिनेरसिकांच्या पसंतीस उतरली होती. रे स्टीवेन्सन यांचा ‘आरआरआर’ हा पहिलाच भारतीय सिनेमा आहे.

रेस्टीवेन्सन हे मार्वलच्या ‘थोर’ फ्रँचायझीमधील व्होल्स्टॅग आणि ‘वायकिंग्स’मधील इतर भूमिकांसाठीही ओळखले जात होते. त्यांनी अॅनिमेटेड स्टार वॉर्स मालिका ‘द क्लोन वॉर्स’ आणि ‘रिबेल्स’मध्ये गार सॅक्सनला आवाज दिला होता. डिस्ने प्लसच्या आगामी ‘द मँडलोरियन’ स्पिनऑफ ‘अशोका’मध्ये रोझारियो डॉसनमध्ये सामील होणार आहे.

हे ही वाचा : 

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर Jayant Patil यांनी दिली पहिली प्रतिक्रिया….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version