Monday, May 20, 2024

Latest Posts

जमणार सर्व महाराष्ट्रातील सुगरणी, लवकरच ‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ प्रेक्षकांच्या भेटीला

युट्युबवर (Youtube) अनेक महिला त्यांच्या रिसीपी शेयर करत असतात आणि त्यांचे अनेक छोट्या पडद्यावर खवय्यांसाठी अनेक खवय्येगिरीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

युट्युबवर (Youtube) अनेक महिला त्यांच्या रिसीपी शेयर करत असतात आणि त्यांचे अनेक छोट्या पडद्यावर खवय्यांसाठी अनेक खवय्येगिरीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. टेलिव्हिजनवर (Television) अनेक खवय्येगिरीचे कार्यक्रम येत असतात. आता अजून एक खवय्येगिरीला अजून रुचकर बनवण्यासाठी एक नवा खमंग असा कार्यक्रम लावकाराच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ (Maharashtrachi Kitchen Queen) हा कार्यक्रम १५ मे पासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सुगरणींमध्ये स्पर्धा रंगणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या खाद्यासंस्कृती देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्राच्या किचन क्वीन या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे करणार आहेत. या प्रोमोमध्ये संकर्षण झळकत आहे. या प्रोमोमध्ये संकर्षण महाराष्ट्रातून आलेल्या सुगरणींची ओळख करुन देत आहे. विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातून या सुगरणीचा आल्या आहेत आणि त्यांची ते ओळख करून देत आहेत. तसेच या तिघी मिळून ज्वारीची भाकरी, शेवभाजी आणि खमंग शेंगदाण्याची चटणी बनवणार आहेत असे त्यांनी सांगितले. ‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ हा कार्यक्रम येत्या १५ मे पासून सोमवार ते शनिवार दुपारी एक वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss