Friday, May 17, 2024

Latest Posts

ऍमेझॉन प्राइमचा पहिला भारतीय सिनेमा प्रदर्शित होणार, धकधक गर्ल मुख्य भूमिकेत दिसणार

६ ऑक्टोबर रोजी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ऍमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा पहिला भारतीय मूळ चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘मजा मा’ नावाच्या या चित्रपटात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि ६ ऑक्टोबर रोजी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बंदिश डाकू फेम आनंद तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट एक ‘हृदयस्पर्शी कौटुंबिक नाटक’ असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट एका पारंपारिक सणाच्या पार्श्वभूमीवरील भारतीय लग्नाच्या संकल्पनेवर आधारित आहे. पोस्टर सूचित करते की या चित्रपटाचा सेट हा नवरात्री दरम्यानचा आहे. या चित्रपटात गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, शीबा चड्ढा, सिमोन सिंग, मल्हार ठकार आणि निनाद कामत यांच्याही भूमिका आहेत.

प्राईम व्हिडिओच्या इंडिया ओरिजिनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “मजा मा हा अनेक भारतीय मूळ चित्रपटांपैकी पहिला आहे, जो थेट आमच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लॉन्च होईल. हा चित्रपट आमच्यासाठी देखील खास आहे. कारण यात एक नायिका आणि तिची ताकद दाखवण्यात आली आहे, बॉलीवूड आयकॉन माधुरी दीक्षितने ही भूमिका पडद्यावर अतिशय सुंदरपणे चित्रित केली आहे .”

दिग्दर्शक आनंद तिवारी म्हणाले, “प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारा आणि खळखळून हसवणाऱ्या या चित्रपटात अनेक भारतीय अनुभवी आणि अष्टपैलू कलारांनी आपला जीव ओतून अभिनय केला आहे. प्राइम व्हिडिओवर मजा मा प्रदर्शित होताना पाहून मला आनंद झाला आहे. भारतीय चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हे खरोखरच समाधानकारक आहे.”

या वर्षाच्या सुरुवातीला माधुरीने नेटफ्लिक्स सिरिज द फेम गेमद्वारे ओटीटीवर पदार्पण केले. शो एका क्लिफहॅंजरवर संपला पण दुसरा सीझन अजून जाहीर झालेला नाही. माधुरी दिक्षित सध्या झलक दिखला जा या रिअॅलिटी शोच्या जजपैकी एक आहेत.

हे ही वाचा:

Flipkart Big Billion Days सेल होतोय सुरु; Apple iPhone 13 बँक ऑफर आणि सवलतींसह 35,000 रुपयांच्या खाली

National Cinema Day: राष्ट्रीय सिनेमा दिवस ढकलला पुढे , ७५ रुपयांना मिळणार नाहीत तिकिटे, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss