Friday, May 17, 2024

Latest Posts

National Cinema Day: राष्ट्रीय सिनेमा दिवस ढकलला पुढे , ७५ रुपयांना मिळणार नाहीत तिकिटे, जाणून घ्या काय आहे प्रकरण

आता २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे.

देशभरातील मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी भारतात १६ सप्टेंबर रोजी सिनेमा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. या दिवशी ७५ रुपयांचे तिकीट खरेदी करून चित्रपट पाहण्याची सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली होती. एकंदर आठवडाभरासाठी हा उत्सव आता पुढे ढकलण्यात आला आहे. आता २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार रणबिर कपूर आणि आलिया भट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा चित्रपट नुकताच नाव सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटाने देश विदेशात २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये या ऑफरमुळे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे.

१६ सप्टेंबर रोजी देशभरातील सर्व सिनेमागृहांमध्ये राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा केला जाईल असे यापूर्वी सांगण्यात आले होते. या सोबतच या दिवशी लोकांना सिनेमागृहात जाऊन अवघ्या ७५ रुपयांची तिकिटे घेऊन चित्रपट पाहता येणार होता. प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी ही ऑफर होती. कोरोना महामारीने देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर चित्रपटगृह बंद करण्यात आली होते. त्यामुळे थिएटर मालकांना आर्थिक फटका बसला. गेल्या वर्षी १६ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा सुरू झाली. आयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रने सिनेमागृहामध्ये पुन्हा गर्दी केली आहे, अशा परिस्थितीत थिएटर मालकांना त्यांचे शेअर्स वाढवायचे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट दिन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फ्रेंड अमेरिकेतून सुरू झाला

भारतात या सिनेमा डेचा ट्रेंड अमेरिकेत साजरा केल्यानंतर आला आहे. ३ सप्टेंबरला अमेरिकेतही राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात आला अमेरिकेशिवाय मध्य – पूर्व ब्रिटन आणि युरोपियन देशांमध्ये अशा प्रकारचे उत्सव साजरे केले जात आहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा थेटर मध्ये आणणे हा यांचा मुख्य उद्देश आहे.

हे ही वाचा:

Watch Video : बंगालमधील भाजप आंदोलनकर्त्यांकडून पोलिसाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Koffee With Karan Episode 10 : आलिया भट्टच्या एका कमेंटवर कतरिना कैफने ‘सुहागदीन’ कल्पना सुचवली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss