Friday, May 10, 2024

Latest Posts

आर्यन खान ची कल्ब मध्ये मित्रांसोबत पार्टी; व्हिडिओ व्हायरल

एनसीबीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खानने वर्षभरानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला.

मुंबई : बॉलीवूड म्हटलं की रात्री उशिरापर्यंत पार्टी करणे, मित्रांसोबत मजा करणे हे सगळं आलंच. क्रूझ वरील ड्रग प्रकरणात गेल्या वर्षी आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. सखोल चौकशी नंतर शाहरुख खानच्या मुलाला नंतर एनसीबीने (NCB) ने क्लीन चिट दिली. क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खानचा पासपोर्टही नुकताच परत करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आर्यन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आर्यन एका कल्ब मध्ये त्याच्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसत आहे.

हेही वाचा

लोणावळ्यात दोन वर्षाचा चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू

 

एनसीबीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खानने वर्षभरानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. अशा परिस्थितीत आर्यन त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी क्लबमध्ये पोहोचला होता. त्याचा क्लबमध्ये पार्टी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्याच एका फॅन क्लबने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आर्यन खान आपल्या मित्रांसोबत क्लबमध्ये वेळ घालवता दिसतोय. इतकच नाही तर आर्यन यामध्ये मित्रांसोबत ड्रिंक्सचा आनंद घेताना ही दिसतोय. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. शाहरुख आता लंडनमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘डंकी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Latest Posts

Don't Miss