Friday, May 17, 2024

Latest Posts

दहा वर्षे रसिकांचे करत असलेल्या मनोरंजनाला कुशल बद्रिकेचा रामराम,शेअर केली भावुक पोस्ट

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने दहा वर्षे प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे.अस्सल मनोरंजनाचा तडका या कार्यक्रमातून आपल्याला पाहयला मिळाला.

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने दहा वर्षे प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे.अस्सल मनोरंजनाचा तडका या कार्यक्रमातून आपल्याला पाहयला मिळाला.अशातच आत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. दरम्यान  याच  कार्यक्रमात आपल्या कॉमेडीच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारा  कुशल बद्रिकेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केलीये. कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील कमेंट्स करत या कार्यक्रमाला निरोप दिलाय.

कुशलने चला हवा येऊ द्याच्या मंचावरचा एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकलाय. त्याला कुशलने निरोप घेतो आता आम्हां आज्ञा असावी हे गाणं टाकलं आहे. तसेच या व्हिडिओला कुशलने दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय. माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार.“चूक भूल द्यावी घ्यावी”, असं कॅप्शन कुशलने या व्हिडिओला दिलंय.

झी मराठी वाहिनीवर तब्बल १० वर्षे  चला हवा येऊ द्या  हा कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केले. पण आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण त्यापूर्वी चॅनलकडून या कार्यक्रमासंदर्भात एक अपडेट समोर आली होती. कारण चॅनलकडून आम्ही या कार्यक्रमाला निरोप देत आहोत तेही पुन्हा परत येणाच्या वचनासोबत असं सांगण्यात आलं आहे. . त्यामुळे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सुरु होणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. डॉक्टर निलेश साबळे ,भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे हे विनोदवीर या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेत. थुकटरवाडी, पोस्टमन, ‘होऊ दे व्हायरल’,’सेलिब्रिटी पॅटर्न’,’लहान तोंडी मोठा घास’ असे अनेक पर्व, मराठीसह बॉलिवूड सिनेमाचं प्रमोशन अशा अनेक गोष्टींची प्रेक्षकांना आता आठवण येईल. पण तीन महिन्यांनी पुन्हा हा कार्यक्रम सुरू होणार असल्याचीही चर्चा आहे.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला हिंगोली दौरा, उमेदवार घोषित होण्याची शक्यता

Covid Vaccine मुळे लोकं आजारी पडायला लागले, Praniti Shinde यांचा अजब दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss