IPL सुरु असतानाही Anupamaa चा दर्जा कायम

भारतात प्रत्येक घराघरात TV वरच्या मालिका बघितल्या जातात. घरात मोठ्यांपासून ते अगदी लहानमुलं देखील या मालिका बघतात. मालिका बघणं हे प्रत्येकाचं रुटीन (Routine) झालं आहे. दर आठवड्याला या मालिकांचे टीआरपी रिपोर्ट (TRP Report) येतात.

IPL सुरु असतानाही Anupamaa चा दर्जा कायम

भारतात प्रत्येक घराघरात TV वरच्या मालिका बघितल्या जातात. घरात मोठ्यांपासून ते अगदी लहानमुलं देखील या मालिका बघतात. मालिका बघणं हे प्रत्येकाचं रुटीन (Routine) झालं आहे. दर आठवड्याला या मालिकांचे टीआरपी रिपोर्ट (TRP Report) येतात. हे टीआरपी बघण्यासाठी प्रेक्षक कायमच आतुर असतात. कोणत्या मालिकेचा टीआरपी हा अव्वल स्थानावर येतोय हे जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. पण सध्या IPL सुरु झाली आहे. IPL ही भारतात घराघरात बघितली जाते. IPL चे चाहते हे भारतात मोठ्या संख्येने आहेत. दरवर्षी ipl मुळे बऱ्याच मालिकांचे टीआरपी कोसळतात. अश्यातच BARC ने आठवड्यात १९ वी टीआरपीची यादी जाहीर केली. या टीआरपी ची यादी बघताच सर्वच जण थक्क झाले आहेत. याचे कारण म्हणजे IPL सुरु असूनही अनुपमा (Anupamaa) या मालिकेने टीआरपीच्या यादीत अव्व्ल स्थान पटकावले आहे. अनुपमा सोडून बाकी सर्व मालिकांचे टीआरपी बुडाले आहेत. अनुपमा या मालिकेची रेटिंग हि २.८ आली असून IPL आणि अनुपमाच्या रेटिंगमध्ये फक्त ०.२ते ०.३ एवढाच काही तो बदल दिसून येत आहे.

अनुपमा नंतर टीआरपी यादीत गम हैं किसी प्यार में या मालिकेने दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. या मालिकेत आयशा सिंह आणि निल भट्ट दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेसोबतच प्रणाली राठोड आणि हर्षद चोपडा यांची ये रिश्ता क्या कहलात है या मालिकेने सुद्धा दुसरा क्रमांक पटकावला आहे. या दोनही मालिकांचे रेटिंग हे २.२ आहे.

BARC दर आठवड्याला टीआरपी रिपोर्ट ची यादी जाहीर करते. या यादीत टॉप १० मालिकांमध्ये इमली, पंड्या स्टोर, ये हैं चाहते, फालतू, ट्रॅक मेहता का उलटा चष्मा, भाग्यलक्ष्मी आणि त्याचबरोबर ‘तेरी मेरी दूरिया या मालिकांचा समावेश आहे.

सध्या सोशल मीडियावर ट्रॉलिंग चा ट्रेंड निघाला आहे. अनुपमा मालिकेला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. अनुपमा या मालिकेत रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांनी प्रमुख भूमिका बजावल्या आहेत. ही मालिका २०२० साली स्टार प्लस सुरु झाली असून प्रेक्षकांना प्रचंड आवडली. सध्या अनुपमा मालिकेत चालू असलेल्या करंट ट्रॅकमुले ही मालिका प्रचंड ट्रोल होत आहे. आणि ट्रोल होत असूनही या मालिकेने टीआरपीच्या यादीत अव्वल स्थान पटवले असून सगळ्यांना याचे नवल वाटत आहे.

हे ही वाचा : 

१६ आमदार अपात्रेबाबत जयंत पाटलांनी दिले स्पष्टीकरण, नार्वेकर आमचे जावई…

समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ, शाहरुखच्या मॅनेजच्या साक्षीमुळे वानखेडे तुरंगात?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Exit mobile version