Friday, May 17, 2024

Latest Posts

आढळरावांचं Amol Kolhe यांना प्रतिउत्तर, पुरावे सादर करण्याचे आवाहन

सध्या निवडणुकीचे वारे संपूर्ण देशभरात वाहत आहे. यादरम्यान उमेदवारांमध्ये तू तू मैं मैं चालूच आहे. मागे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवाजी आढळरावांवरती(Shivaji Aadhalrao) टीका केली होती.

सध्या निवडणुकीचे वारे संपूर्ण देशभरात वाहत आहे. यादरम्यान उमेदवारांमध्ये ‘तू-तू, मैं-मैं’ चालूच आहे. मागे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवाजी आढळरावांवर (Shivaji Aadhalrao) टीका केली होती. या टीकेला आढळरावांनी प्रतिउत्तर दिले आहे. २ दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या (Sharad Pawar) सभेत अमोल कोल्हेंनी शिवाजी आढळरावांवर टीका केली होती. ‘काहींनी मागील १५ वर्षात शेती प्रश्नांऐवजी संरक्षण खात्याच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष दिले. कॉन्ट्रॅक्ट कधी निघणार, सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार याच गोष्टींकडे त्यांचं लक्ष लागून होतं. यावरून जनतेची चिंता कुणाला आहे आणि कुणाला फक्त कंपनीचा हव्यास आहे हे स्पष्ट दिसत असल्याची टीका कोल्हेंनी आढळरावांवर केली होती. कोल्हेंनी केलेल्या या आरोपांवर पुरावे दाखवावेत अशी प्रतिक्रिया आढळरावांनी दिली.

कोल्हेंना प्रतिउत्तर देताना आढळराव म्हणाले, ‘मागील ३ महिने फक्त कांदा-कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कुठलेच विषय शिल्लक राहिलेले नाहीत. याचमुळे ते खालच्या पातळीचे नीच आरोप इतरांवर करत आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे कोल्हेंनी द्यावेत जर पुरावे दिले तर मी स्वतः शिरूर लोकसभेतून माघार घेईल अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीतून माघार घ्यावी.’ असं आवाहन आढळरावांनी कोल्हेंना केलं आहे. आता कोल्हे पुरावे सादर करतात की, माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आढळराव आणि कोल्हेंमधील वादविवाद चालूच आहेत. यामागेही कोल्हेंनी आढळरावांना डमी उमेदवार म्हणून चिडवलं होत. यावर मी डमी नाही तर डॅडी आहे असा प्रतिउत्तर कोल्हेंना दिले होते. दोघेही एकमेकांवर सतत टीका करताना दिसून येतात. कंपनीच्या प्रकरणावरती आता कुठले पुरावे कोल्हे सादर करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

‘यांचं’ स्वतःच कर्तृत्व काहीच नाही, Girish Mahajan यांची MVA वर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss