Thursday, May 2, 2024

Latest Posts

समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ, शाहरुखच्या मॅनेजरच्या साक्षीमुळे वानखेडे तुरंगात?

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) बेड्या ठोकणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या भोवती दिवसेंदिवस अडचणी वाढत चालल्या आहेत.

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) बेड्या ठोकणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या भोवती दिवसेंदिवस अडचणी वाढत चालल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयने त्यांच्या विरोधामध्ये जी तक्रार दाखल केली आहे त्यामधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने जी कारवाई केली होती त्यामध्ये काही नावं जाणीवपूर्वक घेण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमनं आर्यन खानसोबत पैशांचे डील केले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्यन खान प्रकरणाच्या वेळी समीर वानखेडे यांनी शाहरुखच्या मॅनेजरकडे २५ कोटींची मागणी होती आणि ५० लाख रुपये हे टोकन अमाउंट घेतली होती असे समोर आले आहे.

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिची साक्ष यासगळ्या प्रकरणामध्ये महत्वाची ठरणार आहे. यामध्ये आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंचा तपास, त्यांनी केलेली अटक त्यामागील कारणे, त्यांच्यावर खंडणीचा दाखल झालेला गुन्हा आणि त्यांनी आर्यन खान प्रकरणामध्ये अनेकांशी केलेली बातचीत यावर आता ददलानी काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सीबीआयनं या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी घेतल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज सर्वाच्च न्यायालयामध्ये समीर वानखेडे या प्रकरणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी समीर वानखेडे आणि त्याच्या टीमवर चौकशीमध्ये पक्षपात केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ज्यावेळी त्या क्रुझवरील पार्टीमध्ये रेड टाकण्यात आली तेव्हा पहिल्या यादीमध्ये २७ संशयित आरोपींची नावे घेण्यात आली होती. त्यांनतर त्या यादीमध्ये केवळ १० ते १५५ जणांची नावे होती हे कसं काय अशा प्रश्न सीबीआयने समीर वानखेडे याला विचारला आहे.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss