Tuesday, May 14, 2024

Latest Posts

अमृतमय क्षण अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार

अमृतमय क्षण अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्तव असलेले हुरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला आहे. खऱ्याअर्थाने येथे अभिनय सम्राटाचा सन्मान करण्यात आला.’आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. आपल्या कॉमेडीचा अचुक पाया मजबुत करत त्यांनी प्रेक्षकांना पोटभरुन हसायला भाग पाडलं.जवळपास ९०चं शतक गाजवुन प्रचंड लोकप्रियता मिळुन सुद्धा कधीही त्यांनी आपल्या मुळ मातीची आणि जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत’, अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफयांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टी साठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी आपण तयार करु, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं. हा अवघ्या महाराष्ट्रासाठी अमृताहुनी गोड क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच  वरळी येथील डोम, एनएससीआय येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता पार पडलेल्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी अशोक सराफ यांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले.पुरस्कार स्वीकारल्यानतंर अशोक सराफ भावूक ही झाले. अशोक सराफ यांच्यासह  मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला.

 हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ आहे. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे.  अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय, हा अवघ्या महाराष्ट्रासाठी  केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं.

गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर राज्य केले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही, असे त्यांनी सांगितले. मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी यावेळी म्हटलं.

या सोहळ्यासाठी मान्यवर आणि मानकऱ्यांसह मराठी-हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजही उपस्थित होते. निवेदिता सराफ, अशोक सराफ यांचे बंधू सुभाष सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, महेश मांजरेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, कविता लाड, ललित प्रभाकर, आदिती सारंगधर असे अनेक कलाकार या सोहळ्यात उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss