Friday, May 17, 2024

Latest Posts

Mothers Day 2023, आईच्या साडीतही जाणवते आईच्या प्रेमाची उब; ‘Aai Kuthe Kay Karte’ च्या प्रोमोने केलं भावुक

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरलेली आहे. सध्या लोकांमध्ये याच मालिकेची चर्चा असून ही मालिका लोकप्रिय झाली आहे. घरोघरी ही मालिका आवर्जून बघितली जाते. आई कुठे काय करते या मालिकेने सध्या रंजक वळण घेतले आहे.

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरलेली आहे. सध्या लोकांमध्ये याच मालिकेची चर्चा असून ही मालिका लोकप्रिय झाली आहे. घरोघरी ही मालिका आवर्जून बघितली जाते. आई कुठे काय करते या मालिकेने सध्या रंजक वळण घेतले आहे. या मालिकेत सध्या लगीनघाई सुरु झाली आहे. याचवेळी या मालिकेतली ईशा आणि अनिश यांचा साखरपुडा होत आहे. ईशा ही तिच्या आईजवळ म्हणजेच अरुंधती जवळ भावुक होताना दाखवली आहे. दरम्यान आईच्या साडीतही ईशाला मायेची, आईच्या प्रेमाची उब जाणवत आहे.

आज संपूर्ण जगभर मदर्स डे हा दिवस साजरा केला जात आहे अश्यातच स्टार प्रवाहाच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंट वर इशा आणि अरुंधतीचा एक सुंदर विडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा विडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होत आहे. हा एक छोटासा प्रोमो आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती ही देशमुखांच्या वाड्यात तिचे राहिलेले कपडे घेण्यासाठी आलेली आहे असे दिसून येते दरम्यान तिच्या राहिलेल्या साड्या ती बॅगमध्ये भरताना दिसत आहे. त्यादरम्यान ईशा अरुंधती सोबत बोलताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला असेही बघायला मिळत आहे कि ईशा अरुंधती जवळ बोलताना म्हणते,” आई तू तुझ्या सगळ्या साड्या नको ना घेऊन जाऊस. मला झोप लागत नाही तेव्हा मी तुझी एखादी साडी कवटाळून घेऊन बसते. तेव्हा मला पटकन झोप लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

ईशाचे हेच शब्द कानावर पडताच यशाची आई म्हणजेच अरुंधती अतिशय भावुक होऊन ईशाला इशारा करून म्हणते तुला हवी ती साडी तू काढून घे. त्यानंतर ईशा तिला हवी ती साडी काढून घेऊन भावुक होऊन अरुंधतीला मिठी मारते. हा इशा आणि अरुंधतीचा भावनिक क्षण प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे. आई कुठे काय करते या मालिकेचा टीआरपी दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला ६.६ रेटिंग्स आहेत.

तसेच्या सध्या आई कुठे काय करते या मालिकेत सध्या लग्नाची धावपळ सुरु आहे. एकामागून एक असा लग्नाचा विषय या मालिकेत सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता अरुंधतीनंतर आपल्याला या मालिकेत ईशा आणि अनिश यांचा साखरपुडा बघण्यास मिळणार आहे. या मालिकेत सध्या ईशा आणि अनिशचा साखरपुडा पार पडणार असून सध्या दोनही घरात साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु आहे. या साखरपुड्यादरम्यान आपल्याला धमाल, मजामस्ती पाहायला मिळणार आहे. ईशाने तिच्या साखरपुड्यासाठी भरपूर मनपसंत खरेदीसुद्धा केली आहे . आमी त्यांचा साखरपुडा देखील दाण्यात पार पडत आहे.

हे ही वाचा : 

गायकांना चित्रपटातील गाणी गाण्यासाठी पैसे मिळत नाही – अरमान मलिक

सलमान खानने घेतली ममता बॅनर्जी यांची भेट

या अभिनेत्रीला पाहताच क्षणी मिळाली सिनेमात काम करण्याची संधी …… कोण आहे ती?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss