Shivangi Joshi झळकणार Ekta Kapoor च्या नव्या मालिकेत

'ये रिश्ता क्या कहलता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेमधून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री नायरा म्हणजेच शिवांगी जोशी (Shivangi Joshi) आता एका मालिकेमध्ये दिसणार आहे.

Shivangi Joshi झळकणार Ekta Kapoor च्या नव्या मालिकेत

‘ये रिश्ता क्या कहलता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेमधून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री नायरा म्हणजेच शिवांगी जोशी (Shivangi Joshi) आता एका मालिकेमध्ये दिसणार आहे. प्रसिद्ध निर्माती एकता कपूरची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता शिवांगी जोशी हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खतरों के खिलाडी सिझन १२ (Khatron Ke Khiladi Season 12) मध्ये शिवांगी चाहत्यांना पाहायला मिळाली होती. त्याआधी ती बालिका वधू २ मध्ये आनंदीच्या भूमिकेत ती दिसली होती.

शिवांगी जोशी नेहमीच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच ती बेकाबू या मालिकेमध्ये देखील दिसली होती. आता एकता कपूरच्या नव्या मालिकेत ती कुशल टंडनच्या विरोधात दिसणार आहे. एकता कपूरच्या आगामी मालिकेचं नाव ‘बरसाते’ असं आहे. यामध्ये शिवांगी मुख्य भूमिका साकारणार आहे. अजुनपर्यत एकताने मालिकेसंदर्भात कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. बरसाते ही मालिका एक लव्हस्टोरी असणार आहे असे सांगण्यात येत आहे.

जून महिन्याच्या शेवटी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बरसाते या मालिकेचे कथानक हे प्रेक्षकांच्या प्रसंतीस येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. या नाट्यमय मालिकेत शिवांगी पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. १९ जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version