Monday, May 13, 2024

Latest Posts

सोनु सुदचे दिग्दर्शनात पदार्पण,’फतेह’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

 बॉलीवूडमध्ये सध्या अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.अशातच आता अभिनेता सोनु सुद दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. अभिनेता सोनू सूद  दिग्दर्शित फतेह (Fateeh) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. ‘फतेह’मध्ये सोनूने अभिनेता-दिग्दर्शक-लेखक-निर्माता अशी चौपट भूमिका साकारली आहे. 

 या टीझरमध्ये सायबर गुन्ह्यांच्या एका रोमांचकारी जगाची झलक दाखवण्यात आली आहे.जो एक रोमांचक सिनेमॅटिक देऊन जाणार आहे. त्यामुळे या सिनेमाकडून सध्या प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. चित्रपटाची टॅगलाईन ‘नेव्हर अंडरएस्टीमेट अ नोबडी’ अशी आहे. दरम्यान ही या सिनेमाची एक वेगळी गोष्ट असून ती सोनू सूदच्या  वैयक्तिक  प्रवासालाही खऱ्या अर्थाने लागू होत असल्याचं म्हटलं जातंय. फतेहचा टीझर सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केलाय. 

फतेह या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने सोनू सूदही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. याआधी सोनू सूदने या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला होता. ज्याला प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद देखील दिला होता. त्यातच आता या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

‘फतेह’मध्ये सोनूने अभिनेता-दिग्दर्शक-लेखक-निर्माता अशी चौपट भूमिका साकारली आहे. या चित्रपटात भारतीय आणि हॉलीवूड क्रूचे उत्कृष्ट मिश्रण आहे आणि यापूर्वी कधीही न पाहिलेले ॲक्शन सीक्वेन्स यात बघायला मिळणार आहेत. सोनाली सूद शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित, हा चित्रपट सायबर क्राइमच्या गुंतागुंत आणि आव्हानांभोवती फिरतो. 

हे ही वाचा:

यंदाच्या वर्षी तब्बल २ लाख मतदार हे १०० वर्ष वयाचे , निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती

कोणती अभिनेत्री साकारणार मधुबालाची भूमिका, प्रेक्षकांमध्ये उस्तुकत्ता | Madhubala

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss