‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी ७.५ कोटींची कमाई

'द केरला स्टोरी' ('The Kerala Story') हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची देशभरामध्ये प्रचंड चर्चा सुरु आहे. नुकताच हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी ७.५ कोटींची कमाई

‘द केरला स्टोरी’ (‘The Kerala Story’) हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची देशभरामध्ये प्रचंड चर्चा सुरु आहे. नुकताच हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या आधी या चित्रपटाला प्रचंड विरोध करण्यात आला होता. पण वादाच्या भेवाऱ्यामध्ये अडकलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात उतरला आहे. एकीकडे चित्रपट प्रेमी या चित्रपटाचे कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काही मंडळी या चित्रपटावर टीका करत आहेत. पण तरीही रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने ७.५ कोटींची कमाई केली आहे. विकेंडला हा चित्रपट आणखी कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामधील सर्वच कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती विपुल अमृतलाल शाहने केली आहे. या चित्रपटाने असा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. तिच्या भिनयाचे कौतुक तिचे चाहते सोशल मीडियावर करत आहेत. अदा शर्मासह या चित्रपटामध्ये योगिता बिहानी, सिद्धी इडनानी आणि सोनिया बलानी हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. ‘द केरला स्टोरी’या चित्रपटाची निर्मिती ३० कोटींच्या बाजेमध्ये करण्यात आली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट ‘द केरला स्टोरी’ ३ ते ५ कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण या चित्रपटाने जास्तच गल्ला जमावला आहे.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version