Sunday, May 19, 2024

Latest Posts

Christmas 2022 BTS मेंबर V चे ‘Christmas tree’ गाणं लोकांना घालतेय भुरळ, पण या गाण्यामागे दडलेली कथा माहीत आहे का तुम्हाला?

V ने कोरियन ड्रामा आर बिलव्ह्ड् समरसाठी (Our Beloved Summer) OST म्हणून 'ख्रिसमस ट्री' गाणे रिलीझ केले

Christmas 2022 : डिसेंबर महिना म्हटला कि नाताळ म्हणजेच ख्रिसमस (Christmas) आणि न्यू इयर (New Year) हे सण साजरा करण्याची सुरुवात अगदी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून होते. ख्रिसमस (Christmas) साजरा करण्यासाठी, घरात सजावट करण्यासाठी, नवनवे पदार्थ यादिवशी बनवण्यासाठी लोक खरेदीकरीता बाजारात गर्दी करू लागतात आणि याच लगबगी दरम्यान अजून एक तयारी आवर्जून केली जाते आणि ती म्हणजे ख्रिसमस (Christmas) स्पेशल गाण्यांची प्लेलिस्ट (Playlist) तयार करणे. ख्रिसमससाठी (Christmas) गाणी निवडताना त्यात ख्रिसमस रॅपिंग (Christmas Wrapping), व्हॉट ख्रिसमस मीन्स टू मी (What Christmas Means to Me), व्हाईट ख्रिसमस (White Christmas), जिंगल बेल्स (Jingle Bells) अशा नव्या – जुन्या, विविध भाषांमधील किंवा इंटरनेटवर सध्या ट्रेंडिंग असलेल्या अशा सर्व गाण्यांचा समावेश या प्लेलिस्टमध्ये केला जातो.

पण यंदाच्या वर्षी खासकरून ख्रिसमससाठी (Christmas) या सणासाठी जर कोणत्या गाण्याने लोकांना भुरळ घातली असेल तर ते गाणं म्हणजे कोरियातील प्रसिद्ध के – पॉप (K – pop) ग्रुप BTS चा मेंबर असलेल्या V ने गायलेली ‘ख्रिसमस ट्री’ (Christmas Tree) ही OST. V ने कोरियन ड्रामा आर बिलव्ह्ड् समरसाठी (Our Beloved Summer) OST म्हणून ‘ख्रिसमस ट्री’ गाणे रिलीझ केले आणि रिलीज होताच ह्या गाण्याने स्पोटिफाय (Spotify) कोरियाच्या टॉप २०० गाण्यांच्या चार्टमध्ये अव्वल स्थान पटकावले. तसेच या गाण्याने जागतिक स्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल बोलायचे झाले तर, जपानमध्ये स्पोटिफायद्वारे (Spotify) सर्वात जास्त लोकांनी डाउनलोड केलेले (Most downloaded) आणि २०२२ मध्ये पदार्पण करणारे पहिल्या क्रमांकाचे गाणे (debut at No. 1) असे अनेक रेकॉर्ड या गाण्याने आपल्या नावे केले आहेत. तसेच आतपर्यंत कोणत्याही कोरियन गायकाने (Korean solo artist) गायलेल्या गाण्यांपैकी ‘ख्रिसमस ट्री’ (Christmas Tree) हे गाणे रिलीजच्या अवघ्या २९ दिवसात स्पोटिफायवर (Spotify) ३० दशलक्षपेक्षा (30 million) जास्तवेळा स्ट्रीम करणारे गाणे ठरले आहे.

ख्रिसमस ट्री (Christmas Tree) गाण्यामागची कथा…

जरी ‘ख्रिसमस ट्री’ (Christmas Tree) हे गाणे V च्या इतर गाण्यांइतकेच सुंदर असले तरी त्याने या गाण्याचे बोल लिहिलेले नाहीत. त्याऐवजी, गाण्याच्या संगीत दिग्दर्शक, नाम हाय सेउंग (Nam Hye Seung) यांनी V हे गाणे गाईल या उद्देशाने लिहिले होते. जेव्हा नाम हाय सेउंग (Nam Hye Seung) आर बिलव्ह्ड् समरसाठी (Our Beloved Summer) साउंडट्रॅक तयार करत होत्या, तेव्हा त्यांनी BTS मेंबर V ची काही गाणी ऐकली होती आणि V ने गायलेल्या इतर गाण्यांप्रमाणे ‘ख्रिसमस ट्री’ (Christmas Tree) हे गाणेसुद्धा लोकांच्या मनाला भिडावे आणि V नेच हे गाणे गावे ह्या गोष्टी लक्षात घेत त्यांनी मोठ्या मेहनतीने हा साउंडट्रॅक तयार केला.

ख्रिसमस ट्री (Christmas Tree) गाण्याबद्दल काय म्हणाला V?

वेवर्स मॅगझिनला मुलाखती देत असताना BTS मेंबर V ने त्याच्या ख्रिसमस ट्री (Christmas Tree) या रेकॉर्डब्रेकिंग गाण्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला कि, “मी गाण्याच्या संगीत दिग्दर्शक, नाम हाय सेउंग (Nam Hye Seung) यांचा खूप आभारी आहे कि त्यांनी माझ्यासाठी हे गाणे लिहिले. तसेच गाणे लिहिण्यापूर्वी त्यांनी माझी काही गाणी ऐकली, माझी गाणी गाण्याची शैली समजून घेतली आणि मला याचे खूप कौतुक वाटते..”

हे ही वाचा: Christmas 2022 Christmas साजरा करण्यासाठी या शहरांना भेट द्या

Latest Posts

Don't Miss