Sunday, May 19, 2024

Latest Posts

Christmas 2022 हिंदी-इंग्रजीत नव्हे तर ऐका ‘जिंगल बेल्सचं’ व्हायरल भोजपुरी व्हर्जन ‘सांता आवेला’

ख्रिसमसचे सर्वाधिक ऐकलेले आणि गायलेले 'जिंगल बेल्स' ह्या गाण्याचा हिंदी किंवा इंग्रजी व्हर्जनचा नव्हे भोजपुरी भाषेतील व्हिडिओ.

ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मातील लोकांचा मुख्य सण आहे. हा सण जगभरात पसरलेल्या येशू ख्रिस्ताच्या करोडो अनुयायांसाठी पवित्रतेचा संदेश घेऊन येतो.येशू ख्रिस्तयांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जाणारा हा सण दिव्यांचा, आनंदाचा, भेटवस्तूंचा आणि प्रार्थनांचा सण आहे. या दिवशी लोकयेशू ख्रिस्त आणि त्यांचे बलिदान लक्षात आठवतात.

या दिवसाची अजून एक गंमत म्हणजे , ख्रिसमसच्या दिवशी मुलांमध्ये, एक व्यक्ती सांताक्लॉजचा वेश घेतो आणि अनेक भेटवस्तू देतो. अशा परिस्थितीत ख्रिसमसचा एक खास व्हिडिओ दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. तो व्हिडीओ म्हणजे ख्रिसमसचे सर्वाधिक ऐकलेले आणि गायलेले ‘जिंगल बेल्स’ ह्या गाण्याचा हिंदी किंवा इंग्रजी व्हर्जनचा नव्हे भोजपुरी भाषेतील व्हिडिओ. या गाण्याची लोकप्रियता यूट्यूबपासून लोकांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर दिसून येते.

या दिवशी जरी मुख्यत्वे येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा केला जात असला तरी, ख्रिश्चन धार्मिक वर्षाची सुरुवात म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. हा दिवस ख्रिसमास्टाइडच्या १२ दिवसांची सुरुवात करतो. ख्रिसमस ट्री सजवणे हा एक पारंपारिक विधी आहे ज्यामध्ये ओकचे झाड सजवले जाते आणि त्यासाठी लाकूड घंटा, तारे, मेणबत्त्या, कँडी, स्टॉकिंग्ज वापर केला जातो.

‘ख्रिसमस’ हा शब्द जुन्या इंग्रजी शब्द ‘क्रिस्टेस मेसे’पासून बनला आहे. सुमारे २००० वर्षांपूर्वी इस्रायलमधील बेथलेहेम येथे मदर मेरी आणि जोसेफ यांच्या पोटी जन्मलेल्या येशू ख्रिस्ताच्या जन्माला ख्रिसमसचा दिवस आहे. मदर व्हर्जिन मेरी जोसेफशी गुंतलेली होती आणि येशू पवित्र आत्म्याद्वारे गर्भधारणा झाला असे मानले जाते. ज्या देवदूताने मेरीला मुलाच्या जन्माबद्दल सांगितले होते त्याने सांगितले होते की त्याचे नाव येशू ठेवण्यात येईल, कारण तो देवाचा पुत्र आहे.

हे ही वाचा:

Christmas 2022 ख्रिसमस डे निमित्त अशी करा घराची सजावट

CHRISTMAS 2022 ख्रिसमस सण साजरा करण्याची विविध देशांची विविध पद्धती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss