Sunday, May 19, 2024

Latest Posts

यंदा Whatsapp द्वारे द्या New Year च्या शुभेच्छा!

New Year 2023 : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी फार कमी दिवस उरलेले आहे. तसेच बहुतेक लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक लोक देशातून मुंबई या ठिकाणी येतात. कोरोनाच्या निर्बंधानंतर पहिल्यांदा नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धूमधड्याक्यात करण्यात येणार आहे. जीआयएफचा (GIF) वापर करून तुम्ही मित्रमैत्रिणीला शुभेच्छा देऊ शकता. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्हाट्सअँप द्वारे कशा प्रकारे द्यावे या बद्दल सांगणार आहोत.

पुन्हा एकदा नविन वर्ष, पुन्हा एक नवीन आशेचे किरण,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवीन दिशा

नवीन स्वप्नांची नवी लाट
नवीन आरंभ, नवा विश्वास
नवीन वर्षाची हिच खरी सुरूवात
तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

गेले ते वर्ष आणि गेला तो काळ
आता नवीन आशा आकांशा घेऊन आले २०२३ वर्ष
तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

चला मग या नवीन वर्षाचे स्वागत करूया
जुन्या स्वप्नांना
नव्याने पाहूया
तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

मना मनातून आज उजळले
आनंदाचे क्षण
समृध्दीच्या या नजरांनी
घेऊन आले हे वर्ष नवे
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

नविन वर्ष तुम्हाला सुखाचे
समाधानाचे,ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो
या नविन वर्षात तुमचे जीवन आनंदमय आणि सुखमय होऊदे
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

हे नात कायम असेच राहूदे
आणि मनात आठवणींचे दिवे कायम राहूदे
खूप छान होता २०२२ चा प्रवास
अशीच असुदे २०२३ ची साथ
तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही Google Play Store app वर जाऊन new year 2023 stickers for whatsapp असे टाईप करा. या अँपवर तुम्हाला अनेक स्टिकर्स पाहायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला ‘happy new year 2023 Sticker हे स्टिकर्सचे अँप डाऊनलोड करावे लागेल. आणि तुम्ही या अँप मधील स्टिकर्स डाऊनलोड करून whatsapp द्वारे पाठवू शकता.

हे ही वाचा : New Year 2023 : नवीन वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची मेजवानी तुम्हाला माहित आहे का ?

Latest Posts

Don't Miss