Sunday, May 19, 2024

Latest Posts

Christmas 2022 ख्रिसमस हॉलिडेला जाताना ‘या’ गोष्टी सोबत ठेवा

प्रत्येकजण ख्रिसमस (Christmas 2022) आतुरतेने वाट पाहत आहे. जगभरातील लोक मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात. ख्रिश्चन धर्माशी संबंधित लोक या दिवशी चर्चमध्ये जातात आणि पूजा करतात. त्याच वेळी, प्रभु येशूचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी, ते घर सजवतात. पण ख्रिसमस हा सण साजरा करण्यासाठी काही लोक फिरण्यासाठी बाहेर जातात. ख्रिसमसच्या सुट्या म्हणजे आनंदाचे दिवस, ख्रिसमस हा सण २५ डिसेंबर २०२२ रोजी साजरा करण्यात येणार आहे. ख्रिसमस हा सण साजरा करण्यासाठी लोक महाबळेश्वर, मनाली , शिमला किंवा पसंतीच्या ठिकाणी जातात. पण फिरायला जातात कोणत्या गोष्टी सोबत ठेवणे हे तुम्हाला माहित आहे का ? मग जाणून घ्या.

ख्रिसमस हॉलिडेला जाताना सोबत बॅगमध्ये सेल्फी स्टिक आणि कॅमेरा सोबत ठेवणे. कारण आठवण म्हणून जर तुम्हाला एखादी गोष्ट ठेवायची असेल तर तुम्ही त्याचे फोटो किंवा व्हिडिओ देखील काढू शकता. बाहेर फिरायला जाताना (first aid kit) सोबत ठेवणे. जर तुम्हाला काही दुखापत झाली तर तुम्ही (first aid kit) चा वापर करू शकता.

 

ख्रिसमस हॉलिडेला जातांना एक इमर्जन्सी नंबर सोबत ठेवणे. इमर्जन्सी नंबर तुम्ही तुमच्या फोनमध्ये देखील सेव करून ठेवू शकता, किंवा सोबत एक डायरी ठेवणे त्या डायरीमध्ये नंबर नोटडाऊन करून ठेवणे. कारण जर तुम्हाला तिकडे तुमच्या फोनला नेटवर्क नसेल किंवा काही कारणांमुळे फोन वापरता आले नाही तर तुम्ही डायरीचा वापर करू शकता.

फिरायला जाताना सोबत बॅग मध्ये खाद्य पदार्थ सोबत ठेवणे, जसे की बिस्कीट , चिप्स , कुरकुरे , काजू , बदाम , कोल्ड्रिंक , भेळ , चणे , किंवा तुम्हाला आवडणारे पदार्थ देखील तुम्ही सोबत ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला प्रवास करताना भुकेची कमतरता जाणवणार नाही. तसेच सोबत फिरायला जाताना पैसे जास्त ठेवणे, कारन कमी पडू नये म्हणून , थंड हवेच्या ठिकाणी गेल्यास सोबत लेदर जॅकेट आणि स्वेटर सोबत ठेवणे त्यामुळे तुम्हाला चांगली गरम उब मिळते.

 

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss