Sunday, May 19, 2024

Latest Posts

New Year 2023 जगाच्या या कोपऱ्यांमध्ये अशा ‘विचित्र’ पद्धतींनी केले जाते नव्या वर्षाचे स्वागत

नव्या वर्षाचे स्वागत हे अगदी वेगवेगळ्या आणि विचित्र परंपरागत पद्धतींनी केले जाते. ज्यात डेन्मार्कमध्ये प्लेट्स फेकण्यापासून ते इक्वाडोरमध्ये स्कॅरेक्रो जाळण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टींचा समावेश होतो.

काही दिवसात २०२२ वर्ष संपून २०२३ या वर्षाची सुरुवात होणार आहे. न्यू इयर (New Year 2023) हा एक सण आहे जो जगभर मोठ्या प्रमाणात, मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. पण, तुम्हाला माहितीये का जगभरात नव्या वर्षाचे स्वागत हे अगदी वेगवेगळ्या आणि विचित्र परंपरागत पद्धतींनी केले जाते. ज्यात डेन्मार्कमध्ये प्लेट्स फेकण्यापासून ते इक्वाडोरमध्ये स्कॅरेक्रो जाळण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे आता आपण न्यू इयर साजरा करण्याच्या अशाच काही विचित्र परंपरा आणि पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या जगाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात अगदीच सामान्य मानल्या जातात.

  • स्केअरक्रो बर्निंग (इक्वाडोर)

इक्वाडोरमध्ये, अनेक नागरिक नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री कागदाने भरलेला स्कॅरक्रोला जाळतात, तसेच यादिवशी स्कॅरक्रोबरोबर वाईट आठवणी दर्शविणारी कोणतीही जुनी छायाचित्रेसुद्धा जाळली जातात. जुन्या परंपरेनुसार, असे केल्याने गेल्या १२ महिन्यांत घडलेल्या कोणत्याही दुर्दैवी किंवा वाईट गोष्टी दूर करण्यास मदत होते असे मानले जाते.

  • तुटलेली प्लेट्स (डेनमार्क)

उत्सवाच्या प्रसंगी प्लेट्स फोडणे हे ग्रीक लोकांमधील प्रसिद्ध परंपरा असली तरी, डेन्मार्कमध्येही ही परंपरा लोकप्रिय आहे. खरं तर, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला डेन्स लोक चांगल्या नशिबासाठी कुटुंब आणि मित्रांच्या समोरच्या दारात वर्षभर जतन केलेल्या आणि न वापरलेल्या प्लेट्स टाकतात. दुसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीच्या घरासमोर जेवढ्या जास्त प्लेट्स मिळतील तेवढी ती व्यक्ती नशीबवान आहे, असे मानले जाते.

  • १०८ घंट्या (जपान)

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये रस्त्यावरून चालताना १०८ घंटांचा आवाज ऐकू येतो. ही बौद्ध परंपरा आहे जी मानवी पापांना नाहीसे करते आणि चांगल्या नशिबासह नव्या वर्षात प्रवेश करण्यास लोकांना मदत करते, असा जपानी लोकांचा विश्वास आहे.

  • रंगीत अंडरवेअर घालणे (दक्षिण अमेरिका)

परंपरेनुसार, एक अंधश्रद्धा आहे की आपल्या अंडरवेअरचा रंग नवीन वर्ष कसे असेल हे ठरवू शकतो. “मेक्सिको, बोलिव्हिया आणि ब्राझील सारख्या दक्षिण अमेरिकन देशांमध्ये, पुढच्या वर्षासाठी एखाद्या व्यक्तीचे भविष्य त्यांच्या अंडरवेअरच्या रंगानुसार ठरवले जाते,” उदाहरणार्थ, ज्यांना प्रेम हवे आहे त्यांनी नवीन वर्षासाठी लाल अंडरवेअर घालावी , तर संपत्तीची आशा बाळगणाऱ्यांनी पिवळ्या रंगाची निवड करावी. जर तुम्ही शांतता शोधत असाल तर, पांढर्‍या अंडरवेअरची निवड करावी.

  • खिडकीतून फर्निचर फेकणे (इटली)

इटलीमध्ये, अनेक स्थानिक लोक आगामी वर्षाच्या नव्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून जुने फर्निचर खिडकीच्या बाहेर फेकून देतात. उशींपासून ब्लँकेटपर्यंत घरात असणारे कोणतेही मऊ फर्निचर बाहेर फेकत इटलीत नव्या वर्षाची सुरुवात केली जाते.

  • प्राण्यांशी बोलणे (रोमानिया)

रोमानियामध्ये, शेतकरी त्यांचे नवीन वर्ष त्यांच्या पशूंशी संवाद साधण्यात घालवतात. असे मानले जाते कि, जर एखादी व्यक्ती त्यांच्या पशूंशी संवाद साधण्यात यशस्वी ठरली तर नवे वर्ष त्यासाठी चांगले नशीब घेऊन येईल.

हे ही वाचा:

Salman Khanच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नजर टाकूया त्याच्या आतापर्यंतच्या टॉप १० चित्रपटांवर

Salman Khan च्या वाढदिवसानिम्मित रितेश आणि जिनिलियाची स्पेशल पोस्ट, दिल्या भरभरुन शुभेच्छा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss