Sunday, May 19, 2024

Latest Posts

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक या ठिकाणी पोहचले

New Year 2023 : अनेक लोक नवीन वर्षाच्या (New Year 2023) स्वागतासाठी वेगवेगळया पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. लाँग वीकेंड आणि डिसेंबर अखेर असल्यामुळे लोक सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी अनेक पर्यटन स्थळांना भेट देत आहेत. लोणावळा (Lonavala), माथेरान (Matheran) या सारख्या थंड हवेच्या ठिकाणाला पर्यटक भेट देतात.

नवीन वर्ष (New Year) आणि लाँग वीकेंडनिमित्त (Long weekend) माथेरानमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी दिसत असते. माथेरानच्या (Matheran) निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये येतात, तसेच माथेरान हे मुंबई जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदा नवीन वर्षाचे स्वागत धूमधड्याक्यात साजरा केला जाणार आहे. तसेच माथेरानमध्ये मुंबई आणि पुण्यासोबत अनेक लोक देशभरातून येत असतात.

 

लोणावळा हे ठिकाण म्हणजे पर्यटकांची आवडती जागा. हिवाळयात आणि पावसाळयात माथेरान हे ठिकाण नेहमी गजबजलेले असते. इकडचे वातावरण नैसर्गिक रम्य वातावरण असते आणि हे बघण्यासाठी लोक अनेक देशातून देखील येतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. New Year च्या दिवशी लोणावळ्यात पर्यटकांची भरपूर गर्दी पाहायला मिळते.

पालघर येथील पश्चिम किनारपट्टी जवळील केळवे समुद्र किनाऱ्यावर देखील पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. New Yearच्या दिवशी पालघरमधील केळवे पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. केळवेचा सपाट समुद्रकिनारा आणि आजूबाजूची घनदाट जंगल हे निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालून टाकतो. काही लोकांना गोवा आणि अलिबाग ही ठिकाणे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पडवडत नाही म्हणून मुंबई, ठाणे येथील लोक पालघर या ठिकाणी भेट देतात.

कोकणात वीकेंडच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आणि नवीन वर्षांच्या स्वागतासाठी अनेक लोक भेट देतात. कोकणातील Malvan, Dandi, Chiwala, Tarkarli, Devbagh, Kunkeshwar या ठिकाणी अनेक पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. पर्यटकांमुळे कोकणातील समुद्रकिनारी आणि हॉटेल्स गजबजलेले दिसत असतात. त्याच बरोबर लोक कोकणातील पदार्थांचा अस्वाद देखील लुटत असतात.

 

हे ही वाचा :

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

 

Latest Posts

Don't Miss