Vat Pornima 2023: वटपौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या संपूर्ण विधी

वटपौर्णिमा म्हणजे वैवाहिक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा सण. वपोर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वट सावित्रीचे व्रत पाळतात. हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळतात

Vat Pornima 2023: वटपौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या संपूर्ण विधी

वटपौर्णिमा म्हणजे वैवाहिक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा सण. वपोर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वट सावित्रीचे व्रत पाळतात. हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळतात. या दिवशी स्त्रिया अगदी साजशृंगार करून पारंपरिक कपडे परिधान करून त्या वडाच्या झाडाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने आपल्या पती वर कोणतीही संकटे येत नाहीत व आपल्या पतीला निरोगी आयुष्य लाभते. आपल्याला जन्मोजन्मी हाच नवरा मिळुदे अशी प्रार्थना विवाहित स्त्रिया अगदी श्रध्देने करतात. आपले वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी स्त्रिया प्रार्थना करतात. या दिवशी स्त्रिया पारंपरिक पद्धतीने तयार होतात. बहुतेक स्त्रिया या दिवशी साडी नेसून पारंपरिक पद्धतीने साजशृंगार करतात. प्राचीन काळापासून चालत आलेली हा वट सावित्रीचा व्रत आजही स्त्रिया अगदी उत्साहात पाळतात. यावर्षी वटपौर्णिमा ही ३ जून २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. अनेक नवविवाहित स्त्रियांना ही पूजा कशी करायची याची कल्पना नसते. तर जाणून घेऊया वटपौर्णिमा चा संपूर्ण पूजन विधी.

पूजे साठी लागणारे साहित्य

हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी, पंचामृत, अत्तर, कपूर, पूजेचे वस्त्र, विड्याचे पान, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू, सती मातेचा फोटो, किंवा सुपारी

पूजन विधी

सर्वप्रथम पूजन विधीची सुरुवात ही प्रत्येक स्त्रीच्या संकल्पाने केली जाते. प्रथम स्त्रीने “मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’ असा संकल्प करावा. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्री ने उपवास धरला पाहिजे. तर पूजेची सुरुवात ही सुपारीच्या गणपतीची स्थापना करून करावी. गणपतीला हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून त्याची आराधना करावी. त्यानंतर सती मातेची पूजा करावी. हळद कुंकू वाहून, काली पोत व हिरव्या बांगड्या सतीमातेला अर्पण करून घ्याव्या. त्यानंतर वडाच्या मुळाजवळ जाऊ पंचोपचार पूजन व आरती करून घ्यावी. वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर वडाच्या झाडाला तिहेरी दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालताना पुढुळ मंत्र म्हणावा:

सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।

त्यानंतर कोणत्याही पाच सुहासिनीची आंबे आणि गहू याने ओटी भरावी.

हे ही वाचा:

Accident पासून बचाव करायचा असेल तर, करा ‘या’ गोष्टींचे पालन

जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात कोणताही वाद नाही, छगन भुजबळ

Vat Pornima 2023: वट पौर्णिमेनिमित्त तुमच्या पतीला द्या ह्या खास शुभेच्छा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version