Sunday, May 19, 2024

Latest Posts

नारळाच्या दुधापासून बनवू शकतो chocolate Ice-cream

मे महिना संपून आता जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. असे असूनही उन्हाचा प्रभाव कमी झाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. उलट मे महिन्यापेक्षा जून-जुलै मध्ये जास्त उकडत आहे असे सर्व लोक म्हणत आहेत. दुपारी १२ ते ३ या दरम्यान उष्णतेचे प्रमाण अधिक वाढत असते.

मे महिना संपून आता जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. असे असूनही उन्हाचा प्रभाव कमी झाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. उलट मे महिन्यापेक्षा जून-जुलै मध्ये जास्त उकडत आहे असे सर्व लोक म्हणत आहेत. दुपारी १२ ते ३ या दरम्यान उष्णतेचे प्रमाण अधिक वाढत असते. अशा वेळी काहीजण उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पंखा, एसीच्या समोर बसतात. तर काहीजण गार पाण्याने अंघोळ करतात. उन्हामध्ये उकडत असल्यावर अनेकजण आईसक्रीमदेखील खात असतात. तुम्हाला माहित आहे का दुकानामध्ये मिळणारी आईसक्रीम आपण घरी देखील सोप्या पद्धतीने बनवू शकतो. चला तर मग घरच्या घरी व्हेगन चॉकलेट आईसक्रीम कशी बनवायची ते जाणून घेऊयात…

साहित्य –

४२० मि.लि. नारळाचे दूध
अर्धा कप पिठीसाखर
दोनतृतीयांश कप कोको पावडर (साखरविरहित)
अर्धा कप बदाम दूध (साखरविरहित)
४०० ग्रॅम भिजवलेले खजूर
१ चमचा व्हॅनिला

कृती –

१० मिनिटे थंड होण्यासाठी फ्रीजरमध्ये एक मोठा मिक्सिंग बाऊल ठेवा. त्यादरम्यान, फूड प्रोसेसरमध्ये खजुराची जाडसर पेस्ट करा. त्यात थोडे गरम पाणी घाला आणि त्यानंतर ते बाजूला ठेवा. वरील मिश्रणात नारळ दूध आणि साखर दोन्ही एकत्र टाका. मिश्रण मिक्सरमध्ये गुळगुळीत होईपर्यंत नीट आणि व्यवस्थित फिरवा. वरील मिश्रणाचे दोन समान भाग करून घ्या. त्यातील एका भागात कोको पावडर, व्हॅनिला, बदामाचे दूध हे काळजीपूर्वक टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. चवीनुसार आणि आवडीनुसार फ्लेवर्स टाका. एका प्लास्टिकच्या भांड्यात मिश्रण काढून घ्या. त्यानंतर त्या भांड्याला वरून पहिले प्लास्टिक आणि त्यावर फॉइलपेपर याने घाई न करता व्यवस्थित झाका. मूससारखं (Moose) आईसक्रीम हवं असल्यास हे मिश्रण फ्रिजमध्ये दोन तास ठेवा व नीट जमण्यासाठी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.

हे ही वाचा:

मालिकेच्या शूटिंग दरम्यान बिघडली अभिनेत्याची तब्बेत, सेटवरच केला उपचार सुरु…

शरद पवार समोर येताच छगन भुजबळांनी घेतला आशीर्वाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss