Thursday, February 29, 2024

Latest Posts

इडलीसोबत ट्राय करा साऊथ इंडीयन स्टाईल स्पेशल चटणी

आपण सगळे जण नेहमी पोळी-भाजी, भात वरण खात असतो. अश्यावेळी घरातील काही व्यक्तींना सारखे तेच तेच खाऊन देखील कंटाळा हा येत असतो. म्हणून विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी आपण आवर्जून वेगळं काहीतरी करतो

आपण सगळे जण नेहमी पोळी-भाजी, भात वरण खात असतो. अश्यावेळी घरातील काही व्यक्तींना सारखे तेच तेच खाऊन देखील कंटाळा हा येत असतो. म्हणून विकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी आपण आवर्जून वेगळं काहीतरी करतो. यावेळी आपण करायला सोपं पडेल आणि चवीला देखील छान लागेल अश्या पदार्थाची निवड आपण करत असतो. यामधील सर्वात सोपा आणि सर्वाना आवडणारा पदार्थ म्हणजे इडली. प्रत्येकाच्या घरात इडली ही आवर्जून बनवली जाते.

तसेच नाश्त्याला, जेवणाला आणि कोणी पाहुणे येणार असतील तरीही इडली, डोसा, उतप्पा हे प्रकार करणे अगदी सोयीचे असते. डाळींचे भरपूर प्रमाण आणि आंबवण्याची क्रिया झाल्याने हे पदार्थ पोष्टीक असतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खात असल्याने इडली, डोशासोबत सांबार, चटणी हा असा बेत केला जातो. इडली किंवा डोशासोबत आपण साधारणपणे खोबऱ्याची हिरवी चटणी करतो. मिरची, कोथिंबीर, खोबरं, दाणे यांपासून केलेली ग्रीन चटणी नेहमीचीच. पण काही दक्षिणेकडे साऊथ इंडीयन पदार्थांसोबत पारंपरिक अशी लाल रंगाची चटणी केली जाते, काही हॉटेलमध्येही ही चटणी आवर्जून दिली जाते. कारा चटणी अशा नावाने ओळखली जाणारी ही चटणी चवीला खूपच वेगळी आणि चविष्ट असते. आंबट-गोड चव असल्याने ही चटणी आपल्याला खूपच आवडते. ही चटणी घरी कशी बनवायची पाहूया…

सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवा. पॅनमध्ये १ चमचा तेल घाला. त्यामध्ये १ चमचा हरभरा डाळ आणि १ चमचा उडीद डाळ चांगली भाजून घ्यावी. मग पुढे त्यामध्ये बारीक चिरलेला १ कांदा, २ ते ३ लाल मिरच्या आणि लसणाच्या ४ ते ५ पाकळ्या घाला. तेही चांगल्या परतून घ्यायच्या. सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्या. टोमॅटोचे बारीक काप करुन ते सगळ्यात शेवटी पॅनमध्ये घालायचे आणि थोडेसे परतून गॅस बंद करायचा. यानंतर हे सगळे मिश्रण थोडे थंड झाले की ते मिक्सरमध्ये घालायचे आणि यात थोडी चिंच, पाणी आणि मीठ घालायचे. मिक्सर फिरवून ते एकसारखे बारीक करुन घ्यायचे. मग यावर तेल, मोहरी, जीरं, हिंग, कडीपत्ता यांची खमंग फोडणी द्यायची.

Latest Posts

Don't Miss