Thursday, May 16, 2024

Latest Posts

भिजवलेल्या बदामाचे महत्व…

बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. तसेच बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे.

बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. तसेच बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे. बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले बदाम सकाळी उठून खावे त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर होत. असे अनेक जण सल्ला देतात. बदाम हे पाण्यात भि़जवून ठेवले तर त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही सहज निघून जाते. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-३, फॅटी ऍसिड यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं. नेमके हे भिजवलेले बदाम का खावे त्याचे नक्की काय फायदे आहेत हे जाणून घेऊया…

  • भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात.
  • बदामामुळे पोषक द्रव्य मिळतात आणि तसेच कॅलरीज वाढत नाहीत .
  • मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदामाचे सेवन केल्याचं त्यांची शुगर लेव्हल हि नियंत्रणात राहते. तसेच बदामामध्ये तांब्याचे प्रमाण असते त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत देखील मदत होते.
  • बदामामुळे कोरडी त्वचा असणार्‍यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते.
  • गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत.
  • बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ करण्यास मदत करतात.
  • कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते.
  • बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.
  • बदामामुळे कोरडी त्वचा असणार्‍यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते.
  • डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम खातात. डाएटिंग करणारे भूक लागल्यास इतर पदार्थांपेक्षा १२ बदाम खातात. हे बारा बदाम एका ब्रेकफास्टचे काम करते.

बदाम केसे खावेत, त्याचबरोबर एका दिवसामध्ये किती बदाम खावेत याचा ही विचार करणे गरजेचे आहे. बदामांचे सेवन नियमित केल्याने हृदय, मेंदू, त्वचा आणि केसांशी संबंधित विकार दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर बदामाचे सेवन मधुमेह, खोकला, अनिमिया, श्वसनरोगामध्येदेखील फायद्याचे आहे.

तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणचे हवामान, दिवसभरामध्ये तुम्हाला शारीरिक श्रम किती होतात, यावर बदामाचे सेवन अवलंबून असायला हवे. जर तुम्ही उष्ण हवामानाच्या ठिकाणी रहात असाल, तर एका दिवसामध्ये पाच ते सहा बदामाचे सेवन करावे. तसेच शारीरिक श्रम जास्त होत असतील तर ८ ते १० बदामाचे सेवन करावे.

अश्याप्रकारे बदामाच्या सेवनाचे हे फायदे आहे.

हे ही वाचा :-

सलग ४ दिवशी आमिरच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाला लोकांचा थंड प्रतिसाद

Latest Posts

Don't Miss