Thursday, May 16, 2024

Latest Posts

केशराचे हे फायदे जाणून तुम्ही देखील कराल नक्की सेवन…

केशराचा उगम हा तसा ‘ग्रीस’ देशातील आहे. तर भारताच्या ‘काश्मीर’मध्ये याचे पीक घेतले जाते. केशर म्हणजे फुलांच्या आतिल परागकण असतात.

केशराचा उगम हा तसा ‘ग्रीस’ देशातील आहे. तर भारताच्या ‘काश्मीर’मध्ये याचे पीक घेतले जाते. केशर म्हणजे फुलांच्या आतिल परागकण असतात. केशर म्हटले की, केशरी दुध व केशरी पेढा आठवल्याशिवाय राहत नाही. मात्र या केशराचे औषधीय उपयोग आपल्याला क्वचितच माहित असावेत. केशरात ए जीवनसत्व, फोलिक अ‍ॅसिड, तांबे, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मँगनीज, लोह, सेलेनियम, झिंक, मॅग्नेशिअम आणि इतरही काही पोषक घटक मिळतात. त्याशिवाय केशरात लाईकोपिन, अल्फा कैटरिन, बीटा कॅरोटीन हे गुणही असतात. हे घटक शरीराचे आजारांपासून बचाव करतात. केशर आरोग्यासाठी चांगले असतेच पण सौंदर्यासाठीही त्याचा फायदा होतो. केशराचा वापर बहुतेकदा पक्‍वान्‍न तयार करताना केला जातो. त्याचा रंग आणि स्वाद पदार्थाची लज्जत वाढवतो. केशर प्रकृतीने उष्ण असते. त्यामुळेच केशराचे सेवन हिवाळ्यात करणे लाभदायक असते. केशराचे माहीत नसलेले काही फायदे जाणून घ्या .

“केशर” पोषणमुल्ये :- खरा केशर ओळखायचा असेल तर, खायचा सोडा व पाणी यांच्या मिश्रणात केशराच्या काड्या टाकल्यास त्यांचा रंग पिवळा होतो. केशर नसल्यास हा रंग तपकिरी होतो.

केशराचे ३ प्रकार सांगितले आहेत. पद्मगंधी, मधुगंधी, बहलिका गंधी

यातील पद्मगंधी केशर हे श्रेष्ठ मानले जाते.

गर्भधारणेत केशरी दुध :- गर्भधारणेत केशरी दुध पिल्यास मुल गौरवर्णी होते असा समज आहे. मात्र वर्ण ही पुर्णतः अनुवंशीक बाब आहे. पण मातेला केशराच्या सेवनाने बरेच फायदे होतात. गर्भवती महिलांना बाळाची त्वचा चांगली व्हावी म्हणून दुधात केशर घालून दिले जाते. तसेच गर्भारपणात होणारी अरूची (morning sickness) कमी होतो.

दृष्टी सुधारण्यासाठी :- शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास डोळ्यांचा रॅटीना खराब होऊ शकतो. केशरात कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे या समस्येला प्रतिबंध होईल.

स्मुर्ती वाढवण्यासाठी :- स्मुर्ती वाढवण्यासाठी केशराचा उपयोग होतो. अल्झायमर सारख्या आजरांना प्रतिबंध करण्याचा केशर हा नैसर्गिक उपाय आहे. वयोमानानुसार येणारा विसराळूपणा कमी करण्यासाठी केशराची मदत होते.

चेहर्‍याचे सौंदर्य :- केशरामध्ये चंदन आणि दूध मिसळून तो फेसपॅक वीस मिनिटे चेहर्‍यावर लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यात धुवून टाका. आठवड्यातून एक दोन वेळा हा पॅक लावल्यास चेहर्‍याचा रंग उजळेल.

वयवाढ रोखते :- केशरामध्ये अँटिऑक्सिडंट असल्याने व्यक्‍तीचे वय वाढू देत नाही. कच्च्या पपईत चिमूटभर केशर टाकून ते मिसळून चेहर्‍यावर लावल्यास स्वच्छ, निरोगी आणि मुलायम करण्यात मदत होते.

कॅन्सरचा धोका कमी होतो :- शरीरात ट्युमरची निर्मिती किंवा ट्युमर वाढ कमी होण्यास केशर उपयुक्त आहे. स्किन कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी केशर परिणामकारक कार्य करतं. किमोथेरपीमुळे होणारे साईड इफेक्ट्स म्हणजेच वजन कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे यावर मात करण्यासाठी केशराचा फायदा होतो. केशराचे नियमित सेवन केल्यास शरीरातील व्हिटॅमिन ए चे प्रमाण वाढते.

हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी :- केसरामुळे रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. परिणामी हृदयविकारांना आळा बसतो. तसंच उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर केशरामुळे हृदयाचे आरोग्य जपले जाते.

मासिक पाळीच्या वेदना :- काही महिलांना मासिक पाळीत पोटात वेदना होतात. चिडचिड होते, थकवा, सूज येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. रोज केशराचे दूध किंवा चहा प्यायल्यास फायदा होतो.

अश्या अनेक कारणामुळे केशर हे हितकारक आहे.

Latest Posts

Don't Miss