सोप्प्या पद्धतीने बनवा झणझणीत कोळंबी भात!

कोळंबी हा असा समुद्रीमासा आहे जो प्रत्येक जण आवडीने खातो. कोळंबी पासून अनेक विविध प्रकार तयार केले जातात. कोळंबी मास्यात प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. तसेच कॅलरीज देखील कमी प्रमाणात असतात.

सोप्प्या पद्धतीने बनवा झणझणीत कोळंबी भात!

कोळंबी हा असा समुद्रीमासा आहे जो प्रत्येक जण आवडीने खातो. कोळंबी पासून अनेक विविध प्रकार तयार केले जातात. कोळंबी मास्यात प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. तसेच कॅलरीज देखील कमी प्रमाणात असतात. कोळंबी माश्यात अनेक जीवनसत्वे व खनिजे आढळतात उदारणार्थ नियासिन आणि सेलेनियम. कोळंबी हे जगातील कोलेस्टेरॉलमध्ये सर्वात श्रीमंत पदार्थांपैकी एक आहे.अनेक खवय्ये कोळंबीचे कालवण म्हणजेच रस्सा बनवून त्यावर ताव मारतात. अनेकांना कोळंबी फ्राय करून खायला प्रचंड आवडते. कोळंबी पासून तयार केलेला भात सुद्धा अनेकांना खूप आवडतो. नुसते कोळंबी भट म्हंटले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. चला तर मग जाणून घेऊयात घरच्याघरी झणझणीत कोळंबी भात कसा तयार करावा.

कोळंबी भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

अर्धा किलो कोळंबी
अर्धा किलो बासमती तांदूळ
मूठभर खडा मसाला
लिंबू
एक चमचा तिखट
छोटा चमचा हळद
चार कांदे
मूठभर आलं आणि खोबरं
एक चमचा गरम मसाला पावडर
एक टोमॅटो

कृती –

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घ्यावे.नंतर मग कोळंबी स्वच्छ धुवून लिंबू, मीठ, हळद लावून मॅरिनेट करून घावी. तसेच खोबरं, एक कांदा आणि खडा मसाला मंद आचेवर खमंग भाजून अगदी बारीक वाटून घावे. कुकरमध्ये तेल तापायला ठेवावे तेल चांगले तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो व कोळंबी घालून परतुन घावे. या परतवलेल्या कोळंबीला आता पाणी सुटेल, त्यामुळे कोळंबी शिजवून घ्यावी, आता यात तांदूळ न‌थिळून घालावेत, तसेच त्यात वाटण घालून चांगले ढवळून घावे. नंतर त्यात बासमती तांदूळ घालून अगदी अलगद हलवावे व त्यात बेताचं पाणी, मीठ घालावं. तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करावा. आधी मीठ घातल्याने पुन्हा मीठ घालताना अंदाजाने घालावे, वरून कोथिंबीर पेरावी. अशा प्रकारे आपला झणझणीत व चविष्ट कोळंबी भात तयार आहे.

हे ही वाचा:

नेहमीच्या चहाला बनवा स्पेशल, घरच्या घरी इराणी चहा बनवण्याची सोप्पी पद्धत!

Dark Circles पासून मुक्ती हवी आहे का? या फळाचा करा वापर !

पुण्यात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version