Friday, April 26, 2024

Latest Posts

नेहमीच्या चहाला बनवा स्पेशल, घरच्या घरी इराणी चहा बनवण्याची सोप्पी पद्धत!

प्रत्येकाच चहा सोबत वेगळ नातं असत. प्रत्येकालाच चहा अमृता प्रमाणे असतो. मोठ्यांपासून ते अगदी लहानांपर्यंत सर्वांनाच चहा प्यायला प्रचंड आवडतो.

प्रत्येकाच चहा सोबत वेगळ नातं असत. प्रत्येकालाच चहा अमृता प्रमाणे असतो. मोठ्यांपासून ते अगदी लहानांपर्यंत सर्वांनाच चहा प्यायला प्रचंड आवडतो. चहा चे सेवन केल्याने मन तृप्त होते. तसेच अनेकांना ताजेतवाने वाटते. पावसाळ्यात चहा पिण्याची गोष्टच खूप वेगळी असते. परंतु ९० टक्के लोकांना कडाकाच्या उन्हात देखील चहा प्यायला खूप आवडतो. आपल्या दिवसाची सुरवातच चहा पायल्याने होते. अनेकांसाठी चहा म्हणजे खरं सुख आहे. चहाचे अनेक विविधी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ब्लॅक टी, मिंट टी, ग्रीन टी, लेमन टी, मसाला टी हे प्रसिद्ध चहा चे प्रकार आहेत. जे लोक आवडीने पितात. इराणी चहा सुद्धा आवडीने पिण्यास बहुतांश लोकांची पसंती असते. इराणी चहाला अनेक ठिकाणी हैद्राबादी चहा किंवा हैद्राबादी दम चहा म्हणतात. इराणी चहा अगदी क्वचितच दुकानांमध्ये मिळतो. अशातच अनेकांना इराणी चहा सेवन करता यावा म्हणून आम्ही खास तुमच्या साठी इराणी चहाची घरगुती रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात घरच्याघरी इराणी चहा कसा तयार करावा.

इराणी चहा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

पाणी – २ कप
चहा पावडर – २ चमचे
साखर- २ मोठे चमचे
दूध – ५०० मिली
कंडेन्स्ड मिल्क
३-४ वेलची

इराणी चहा तयार करण्यासाठी पुढील कृती करावी –

इराणी चहा बनवण्यासाठी सर्वात आधी एक भांड घ्यावे, त्यात पाणी उकळायला ठेऊन त्यात चहा पावडर घालावी नंतर या भांड्यावर झाकण घालावे. आपण बिर्याणी बनवताना वाफ बाहेर जाऊ नये म्हणून झाकणावर कणीक लावतो. त्याच प्रकारे चहा उकळवताना भांड्यावर घातलेल्या झाकणावर कणिक लावावे. हे लावून चहा २० मिनिटे उकळून घ्यावा. नंतर दुसऱ्या भांड्यात दूध उकळवायला ठेवावे तसेच त्यात वेलची पूड घालून चांगले मिक्स करावे. दूध तापून अर्ध होत आल्यावर त्यात कंडेन्स मिल्क घालावे व एक उकळी येऊन द्यावी. दुसरीकडे ठेवलेल्या चहाला चांगलं आधण आलं कि त्यात साखर घालावी आणि हे पाणी एका कपात गाळून घ्यावे. साधारणतः अर्धा कप भरेल इतकं पाणी गाळून घ्यावे. आणि उरलेल्या अर्ध्या कपात उकळलेलं दूध घालावे व चहा एकत्र मस्तपैकी हलवून घ्यावे. अशा प्रकारे घरगुती इराणी चहा तयार आहे.

हे ही वाचा:

हा Korean पदार्थ बनवा घरच्या घरीच, जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

Dark Circles पासून मुक्ती हवी आहे का? या फळाचा करा वापर !

मुख्यमंत्री Eknaath Shinde ८ वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss