Monday, May 20, 2024

Latest Posts

सोप्या पद्धतीमध्ये बनवा मोदकाच्या आमटी

१९ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे. आता बाप्पा १० दिवस मंडपात विरजमान आहेत. मोठ्या उत्साहात आणि जलोशात बाप्पाचे आगमन झाले आहे.

१९ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे. आता बाप्पा १० दिवस मंडपात विरजमान आहेत. मोठ्या उत्साहात आणि जलोशात बाप्पाचे आगमन झाले आहे. आगमन झाल्यानंतर बाप्पाची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. घरी गोडाचे पदार्थ बनवले जातात. नैवेद्यमध्ये उकडीचे मोदक, खीर, पुरणपोळी हेच पदार्थ दाखवले जातात. पण तुम्ही बापाच्या नैवेद्यासाठी कधी मोदकांची आमटी दाखवली आहे का? मोदकांची आमटी हा पदार्थ खान्देशातील पारंपरिक पदार्थ आहे. मोदकाची आमटी याला ‘उंबर हंडी असे देखील म्हंटले जाते. चला तर पाहुयात मोदकांची आमटी कशी बनवतात याची रेसिपी

साहित्य:-
बेसनाचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड , कांदा, कोंथिबीर, दोन चमचे तीळ, दोन चमचे कारळे,एक चमचा खसखस, दीड वाटी भाजून घेतलेले सुके खोबरे, तेल

कृती:-

मोदकाची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका एका पॅन मध्ये सफेद तीळ आणि किसलेल सुख खोबर नीट भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर ते थंड करून घ्या. थंड करून झाल्यानंतर भाजलेलं खोबर आणि सफेद तीळ मिक्सर मधून वाटून त्याचा मसाला बनवून घ्या. त्यानंतर त्यात कांदा आणि कोथांबीर बारीक चिरून टाका. एका ताटात बेसनाचे पीठ, तांदळाचे पीठ आणि गव्हाचे पीठ मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, मसाला, हळद, मीठ, गोडा मसाला आणि थोडेसे तूप टाकून घ्या. हे सगळं नीट मिक्स झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून कणिक मळून घ्या.

आमटी बनवण्यासाठी सुख खोबर एका कढईत भाजून घ्या. त्यानंतर त्यात पुन्हा तेल टाकून कांदा, आलं आणि लसूण भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर ते ऐका ताटात काढून घ्या. एक चमचा हळद, मसाला, धणेजीरे पावडर आणि चवीपुरते मीठ घालून घ्यावे. परतलेला कांदा, लसूण, आल्याचे काप व सर्व मसाला, कोथिंबीर एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून मसाला तयार करा.त्यानंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी-जिऱ्याची फोडणी द्या व त्यामध्ये तयार केलेला मसालाही मिक्स करा. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून घ्या. आणि कढईवर झाकणही ठेवावे. तर दुसऱ्या बाजूला मळून ठेवलेल्या कणिकाची पारी तयार करून त्यात बनवलेले मिश्रण घालावे आणि मोदकाचे लहान आकार बनवून घ्या. आता उकळत असलेल्या आमटीमध्ये हे बनवलेले छोटे मोदक सोडावेत. थोड्या वेळाने वरून कोथांबीर टाकावी. तयार आहे मोदकाची खमंग आमटी.

Latest Posts

Don't Miss