Wednesday, May 22, 2024

Latest Posts

गणपतीसाठी बनवा खास चणा डाळीचे मोदक

गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणरायाचे आगमन होऊन ७ दिवस देखील पूर्ण झाले होते.

गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणरायाचे आगमन होऊन ७ दिवस देखील पूर्ण झाले होते. बाप्पाच्या आगमनानंतर विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गणरायाच्या आगमनामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण फक्त उकडीचे मोदक, शेंगदाण्याचे मोदक, ड्रायफ्रूट मोदक इ. प्रकारचे मोदक दाखवतो. पण तुम्हाला माहित आहे का चणा डाळी पासून सुद्धा मोदक बनवले जातात. नसेल माहित तर जाणून घेऊया चणा डाळीचे मोदक

साहित्य :-
तांदळाचे पीठ १ वाटी
मीठ (चवीनुसार)
गूळ पाऊण वाटी
चणा दाळ १ वाटी
किसलेले खोबरे अर्धा वाटी
वेलायची पावडर (चवीनुसार)
तूप (गरजेनुसार)

कृती:-
चणा डाळीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळस्वच्छ धून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये गरजेनुसार पाणी टाकून शिजवून घ्यावी. डाळ चांगली शिजण्यासाठी कुकरच्या ३ ते ४ शिट्या काढून घ्याव्यात. त्यानंतर गॅस कमी करून पाच मिनिट डाळ पुन्हा शिजण्यासाठी ठेवावी. पाच मिनिट डाळ शिजवून झाल्यानंतर कुकर थंड करून घ्यावा. त्यानंतर एका पॅनमध्ये गूळ गरम करण्यासाठी ठेवावे.गूळ पूर्ण वितळल्यानंतर चाळणीने चाळून घ्या. त्यानंतर पुन्हा एका पॅनमध्ये नारळाचा किस, शिजलेली चणा दाळ मिक्स करून घ्या. हे मिश्रण घट होईपर्यंत शिजवून घ्या. त्यात विलायची पावडर, तूप मिसळून घ्या. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून थंड होऊ द्या.तांदळाच्या पिठाची उकड बनवण्यासाठी एका टोपात पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून मिक्स करून घ्या. आणि एक वाफ काढा. थंड झाल्यावर त्यात १ चमचा तेल घालून कणीक मळून घ्या. त्यानंतर पिठाचे छोटे गोळे करून त्याची पारी तयार करून घ्या. पारी तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये डाळीच्या पिठाचे सारण भरून घ्या. आणि मोदकाच्या काळ्या बनवून घ्या. अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.सर्व मोदक बनवून झाल्यानंतर ते वाफवण्यासाठी ठेवून घ्या. वाफ काढून झाल्यानंतर मोदक थोडे थंड झाले की तयार आहेत चणा डाळीचे मोदक.

हे ही वाचा: 

महाजनांनी पुन्हा करुन दाखवलं, २१ व्या दिवशी चौंडीतील धनगर समाजाचं उपोषण मागे…

Asian Games 2023, भारतीय घोडेस्वारी संघाने रचला इतिहास, ४१ वर्षांनंतर जिंकले सुवर्णपदक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss