Friday, March 29, 2024

Latest Posts

वटपौर्णिमेनिमित्त केलेल्या उपवासासाठी बनवा ‘हा’ खास पदार्थ; जाणून घ्या स्पेशल रेसिपी

अनेक महिला आपल्या नवऱ्यासाठी वट सावित्रीचे व्रत पाळतात. आपल्याला सात जन्म हाच नवरा मिळूदे यासाठी त्या वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी महिला या पारंपरिक पद्धतीने साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात.

अनेक महिला आपल्या नवऱ्यासाठी वट सावित्रीचे व्रत पाळतात. आपल्याला सात जन्म हाच नवरा मिळूदे यासाठी त्या वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी महिला या पारंपरिक पद्धतीने साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या पतीच्या दीर्घकालीन आयुष्यासाठी तसेच आपले वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी त्या प्रार्थना करतात. या दिवशी महिला आपल्या पतीसाठी उपवास करतात. यादिवशी महिलांना उपवासासाठी कोणता पदार्थ बनवायचा असा प्रश्न पडतो. नेहमीच उपवासाला आपण साबुदाण्याचे पदार्थ बनवतो. पण सारखे तेच तेच पदार्थ खाऊन काहीवेळेस आपण कंटाळून जातो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असाच एक खास पदार्थ ज्याचे नाव आहे उपवासाची कचोरी. ही कचोरी अतिशय पौष्टीक असून चवीलाही तितकीच छान आहे. ही कचोरी उपवासालाही चालते. म्हणूच तिला उपवासाची कचोरी म्हंटले जाते. चला तर मग पाहुयात ही उपवासाची स्वादिष्ट कचोरी बनवायची तरी कशी.

उपवासाची कचोरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

बटाटे २ – ३

वारीचे पीठ ४ चमचे

किसलेलं खोबर २ ते ३ चमचे

ड्रायफ्रूट्स (आवडीनुसार)

वेलची पावडर १ चमचा

किसमिस

पिठीसाखर किंवा जाडी साखर २ – ३ चमचे

१ चमचा तीळ

तेल

उपवासाची कचोरी बनविण्यासाठीची कृती:

सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे, त्यानंतर बटाट्याची सालं काढून ते चांगल्याप्रकारे कुस्करून घ्यावे. कुस्करलेल्या बटाट्यामध्ये वरीचे पीठ टाकून व्यवस्थित मळून घ्यावे. त्यात पिठीसाखर घाला . त्यानंतर दुसरीकडे एक छोटा बाउल घ्या त्यामध्ये खोबर किसून टाका त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स , भाजलेले तीळ, साखर, आणि वेलची पावडर टाकून व्यवस्थित रित्या मिश्रण करून घ्या. नंतर त्या पिठाचे गोल गोळे बनवा. नंतर पिठाची पारी करून तयार केलेले सारण भरून घ्या. त्यानंतर त्याला वरीचे पीठ लावा. नंतर तुमच्याकडे असलेली एक कढई घ्या. गॅस पेटवून कढई गॅस वर ठेऊन त्यात तेल गरम करत ठेवा. आणि त्यात वरील आवरण टाळून घ्या. अश्याप्रकारे उपवासाला बनवलेली कचोरी तयार होईल.

हे ही वाचा:

“त्या” मागण्यांमुळे उद्धव ठाकऱ्यांना जावे लागणार नव्या संकटाला सामोरे

शाहिदचा नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच, या तारखेला होणार चित्रपट प्रदर्शित

पश्चिम बंगालमधील “द केरला स्टोरी” चित्रपटाची बंदी हटवली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss