Sunday, May 19, 2024

Latest Posts

यंदा CHRISTMAS च्या दिवशी कसा जाणार तुमचा दिवस ? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

आज आपण आपल्या योग्यतेप्रमाणे संपूर्ण क्षमतेने कामकाज पूर्णत्वास न्याल. तुमच्या अधिकारात येणाऱ्या प्रत्येक विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न कराल.

मेष : आज आपण आपल्या योग्यतेप्रमाणे संपूर्ण क्षमतेने कामकाज पूर्णत्वास न्याल. तुमच्या अधिकारात येणाऱ्या प्रत्येक विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न कराल. नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर ती मिळू शकेल. वाणीतील आक्रमकतेची धार बोथट होईल. मात्र आपण आपल्या भूमिकेवर ठाम रहाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. गृह सजावटीसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी कराल.

वृषभ : तुमची कीर्ती – प्रतिष्ठा वाढेल. अनेक दिवसांपासून प्रयत्नात असलेल्या कामांना गती प्राप्त होईल . भावंडांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल तसेच तुमच्याकडूनही मिळतेजुळते घेतले जाऊ शकेल. मानेचे विकार असल्यास उपचाराची आवश्यकता भासेल. प्रवासाचे बेत आखाल. तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळून संकल्पित कामासाठी अधिक ऊर्जा प्राप्त होईल.

मिथुन : आज आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन टाळावे अन्यथा सामाजिक टीकेचे लक्ष होण्याची शक्यता आहे. अकारण मनस्ताप वाढेल अशी कोणतीही कृती होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न काहीअंशी पथ्यावर पडतील . शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. डोळ्याचे विकार असल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार करून घ्यावेत.

कर्क : आजचा दिवस मित्रपरिवारासोबत मौजमजा करण्यात जाईल. नवीन मित्र जोडले जातील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज फायद्याचा दिवस आहे. तुमच्या कलागुणांचे प्रदर्शन सामाजिक संदेश देणारे ठरेल. राजकीय विरोधक आक्रमक होतील. काहीप्रमाणात बौद्धिक कमजोरी देखील जाणवू शकेल. ह्रदय विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, वैद्यांच्या सल्याने उपचार घ्यावेत.

सिंह : आज मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण घडेल. विरोधकांच्या प्रश्नोत्तरांचा सामना करावा लागेल. पर्यटनाला गेले असल्यास अन्नातून विषबाधा होणे , हिंस्त्र पशूपासून धोका होणे अशा घटना घडू नयेत यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता वाटते. कोणत्याही परिस्थितीत अधिकचे कर्ज वाढणार नाही असा प्रयत्न करा.

कन्या : आज तुम्ही करीत असलेल्या अभ्यासाला नवीन दिशा प्राप्त होईल. अनेक पैलूंचा उलगडा झाल्याने कामाचा उत्साह वाढेल. अध्यात्मिक दृष्टीने अनेक विषयांचे अभ्यास करून करून अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी होईल. तुमच्या मुखातून थोरांबद्दल सन्मानाचे उद्गार निघाल्याने त्यांना आत्मिक समाधान देऊ शकाल.

तूळ : समाजात किंवा जागतिक स्तरावर होत असलेले बदल अभ्यासायला हवेत. व्यवहार – व्यापार – संस्कार -परंपरा अशा विविध पैलूंची एकत्र मोट बांधली तरी कोणत्या निष्कर्षापर्यत पोहोचण्यासाठी अथक परिश्रमाची पराकाष्ठा करावी लागेल. कपोलकल्पित गोष्टी व्यवहारात आणल्यास त्यात मोठी फसगत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचे प्रत्येक पाऊल सावधानतेनेच उचलावे.

वृश्चिक : सामाजिक स्तरावर तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वीकारलेल्या उद्योग – व्यवसायात नाविन्यपूर्ण घटना घडवून आणण्यात आपला सिंहाचा वाटा असेल. दुर्जनांची संगत टाळावी त्याने मानहानी देखील होऊ शकते. पारिवारिक स्नेह संबंध सुधारतील. चार्टर्ड अकाउंटन्ट , मोठे उद्योजक यांच्यासाठी आजचा दिवस अत्यन्त महत्वपूर्ण आणि ऊर्जावर्धक राहील.

धनु : आज आपण आपल्या विचारांवर आलेले मळभट झटकून काम करायला हवे. मामाकडील नातेवाइकांकडून उत्तम सहकार्य मिळेल. रक्तदाबाचा विकार असल्यास दुर्लक्ष करू नये. आज घेतलेली कर्जाऊ रक्कमेची लवकर परतफेड होऊ शकणार नाही. मंगलमय सोहळ्यात सहभागी व्हाल. विवाह इच्छूकांचे विवाह निश्चित होतील.

मकर : तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. अधिकारीक वाणीने दिलेला संदेश समाजमन बदलवण्यास प्रभावशाली ठरेल. विशेषकरून धर्मगुरू किंवा भविष्यवेत्ते यांच्यासाठी आजचा दिवस अत्यन्त जबाबदारीने सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा आहे. दूरचे प्रवास टाळणे हिताचे ठरेल. तीर्थक्षेत्राच्या यात्रा घडतील. रहात्या घरी काही प्रमाणात बेचैनी निर्माण होऊ शकेल.

कुंभ : आज सामाजिक समारंभांना उपस्थित रहात असतानाच तुम्हाला तुमच्या वाणीवर देखील नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. विविधप्रकरच्या आरोपप्रत्यारोपामुळे मानसिक विचलितता निर्माण होऊ शकेल. बौद्धिक संतुलन राखण्यासाठी इष्ट देवतांची आराधना तुम्हास तारक ठरेल. आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हिताचे राहील.

मीन : आज आपणास इतरांसाठी काहीतरी करावे अशी भावना जागृत होईल. तुमचे भाव -विचार -कला- कौशल्य -वाणी यांचा गौरव केला जाऊ शकतो. आर्थिक उत्पनाच्या बाजू अधिक बळकट होऊ शकतील. मध्यस्थिच्या व्यवहारातून उत्तमप्रकारे अर्थार्जन करू शकाल. संरक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी बाजू शकाल. तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल.

 

हे ही वाचा : 

WhatsApp, Instagram ॲप्ससह साजरा करा Christmas, ट्रेंडी स्टिकर वापरून प्रियजनांना द्या Merry Christmasच्या शुभेच्छा

Christmas Party 2022 ख्रिसमस पार्टीसाठी करा असा सिम्पल मेकअप आणि दिसा सुंदर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss