Sunday, May 5, 2024

Latest Posts

Christmas Party 2022 ख्रिसमस पार्टीसाठी करा असा सिम्पल मेकअप आणि दिसा सुंदर

Christmas Party 2022 : ख्रिसमस या सणाला आज रात्री पासून सुरुवात होणार आहे. आणि ख्रिसमस म्हंटल्यावर पार्टी तर आलीच. आणि पार्टी साठी आपण वेगवेगळया प्रकारचे कपडे घालतो आणि त्याच बरोबर मेकअप देखील करतो. प्रत्येक तरुणीला आपण सुंदर दिसावे असं वाटतंच, रात्रीच्या वेळी ख्रिसमस पार्टी असतात आणि पार्टीला जायचे असेल तर, मेकअप हा गडद व चमकदार हवा, पण दिवसाची वेळ असेल तर मात्र मेकअप हलका व नैसर्गिकच असला पाहिजे.

भुवयांचा आकार चेहऱ्याला अनुसरूनच करा. भुवयांना नैसर्गिक काळेपणा व दाटपणा येण्यासाठी आयब्रो पेन्सिल वापरा. डोळे सुदंर दिसण्यासाठी पापण्याच्या वर आयशॅडो लावा. पोशाख व तुमच्या रंगाशी मिळत्याजुळत्या आयशॅडोचाच वापर करा. वेळ प्रसंगानुरूप पावडर किंवा क्रीम स्वरूपातील आयशॅडो वापरा.
डोळ्यांच्या पापण्या काळ्या, लांब व घनदाट बनवण्यासाठी मस्कारा वापरा. मस्काराचा एक थर वाळल्यानंतर त्याचा सुरेख परिणाम मिळण्यासाठी आणखी एक थर लावा. आजकाल मस्कारा काळ्या, तपकिरी व निळ्या रंगामध्ये मिळू लागलाय. त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या रंगानुरूपच मस्कारा वापरा.

 

ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही डोळ्यांना आयशॅडो (eyeshadow) वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकता. आणि त्यावर आयशॅडो (eyeshadow) लावताना सुंदर असं डोळ्यांना नक्षीकाम देखील करू शकता. असे केल्याने डोळ्यांना एक वेगळी प्रकराची शोभा येई. त्याच बरोबर तुम्ही सांता क्लॉजचे (Santa Claus) स्टीकर देखील चिटकवू शकता. यामुळे डोळे खूप सुंदर दिसू शकता. जर तुम्ही ख्रिसमस पार्टी साठी एखादा लाल रंगाचा ड्रेस किंवा वन पिस घातला असेल तर त्यावर शोभेल अशी लाल रंगाची लिपस्टिक देखील तुम्ही लावू शकता. आणि त्यावर शोभेल असे कानातले. यामुळे तुम्हाला एक वेगळया प्रकारे पार्टी लुक मिळेल.

ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही तुमची नखे देखील आर्ट करू शकता, म्हणजे नेलं आर्ट देखील करू शकता. असे केल्याने तुमची नख खूप सुंदर दिसतील. किंवा तुम्ही पार्लर मध्ये देखील जाऊन नेल आर्ट करू शकता.

हे ही वाचा:

Christmas 2022 हिंदी-इंग्रजीत नव्हे तर ऐका ‘जिंगल बेल्सचं’ व्हायरल भोजपुरी व्हर्जन ‘सांता आवेला’

Christmas 2022 BTS मेंबर V चे ‘Christmas tree’ गाणं लोकांना घालतेय भुरळ, पण या गाण्यामागे दडलेली कथा माहीत आहे का तुम्हाला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss