Thursday, May 16, 2024

Latest Posts

वाढत्या उन्हाचा चेहऱ्यावर परिणाम होतोय? मग हा उपाय केलात का?

महिलांना नेहमी  वाटतं आपण सुंदर दिसावं. म्हणुनच महिला चेहऱ्याची फार काळजी घेतात आणि बाजारातून  महागडे मेकअप प्रोडक्ट घेतात.  प्रदूषण आणि वाढत्या वयामुळे चेहरा खराब होतो. सध्या उन्हाळयाचे दिवस चालू झाले आहेत. यामुळे चेहऱ्याची  काळजी घेणे महत्वाचे आहे.

जसजसा उन्हाळा आला की लोक थंड वस्तूंकडे वळतात.  झोपेतून उठल्यावर अनेकांना चेहरा थंड पाण्याने धुवायची सवय आहे. पण चेहरा बर्फाने घासल्याने त्वचा चांगली आणि चमकदार  राहतो. चेहऱ्यावर बर्फ वापरल्यावर किंवा बर्फाच्या पाण्याने तोंड धुणे यालाच आइस वॉटर फेशिअल असे म्हणतात.

बर्फाने चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावरील विषारी पदार्थ काढून टाकतो. चेहऱ्यावर सूज येत असेल तर किंवा डोळ्यांखाली काळवाटपण येत असेल तर चेहऱ्यावर बर्फाने मसाज करा. पण जरा चुकीच्या पद्धतीने बर्फाचा मसाज केल्याने चेहऱ्याला हानी पोहोचू शकते. बर्फाचे तुकडे थेट चेहऱ्यावर लावल्यास चिडचिड होऊ शकते. यामुळे बर्फ रुमालात किंवा सुती कापडामध्ये घेऊन चेहऱ्यावर लावा. चेहरा न धुता बर्फ लावल्यास बॅक्टेरिया, धूळ, घाण चेहऱ्याच्या छिद्रामध्ये जाऊन राहतात. यामुळे त्वचेचा रोग होऊ शकतो. त्वचेच्या रक्तप्रवाहावर वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे चेहऱ्यावर बर्फ लावताना काळजी घेणे महत्वाचे आहे.

हे ही वाचा:

Sonu Sood चे WhatsApp बंद? कारण काय?

असे करा करवंदाचे लज्जतदार लोणचे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss