वजन कमी करायचंय? तर हिरव्या मिरचीचा करा आहारात समावेश

आपल्या सर्वांना जेवणात तिखट झणका आवडतो का? खरं तर, महाराष्ट्रातील अनेक पदार्थ झणझणीत म्हणून प्रसिद्ध आहेत. अश्यातच मिरची हा अनेक झणझणित पदार्थांमध्ये महत्वाचा भाग आहे.

वजन कमी करायचंय? तर हिरव्या मिरचीचा करा आहारात समावेश

आपल्या सर्वांना जेवणात तिखट झणका आवडतो का? खरं तर, महाराष्ट्रातील अनेक पदार्थ झणझणीत म्हणून प्रसिद्ध आहेत. अश्यातच मिरची हा अनेक झणझणित पदार्थांमध्ये महत्वाचा भाग आहे. हिरवी मिरची – केवळ पदार्थांची चव वाढवत नाही तर पौष्टिकतेने सुद्धा समृद्ध असते आणि वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करते. मिरच्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात. हेच गुणधर्म वजन घटवण्यासाठी मदत करतात.

हिरव्या मिरच्यामुळे आपण बनवलेल्या जेवणाला तिखटपण येतो तुम्ही एखादी भाजी बनवत असाल किंवा खिचडी बनवत असाल, तर त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्याने (Green Chillies) जेवणाची चव वाढेते. हिरव्या मिरच्यामध्ये बी-6, विटामिन- ए, आयर्न, पोटॅशियम आणि कॉपर यासारखी पोषण तत्वे आढळून येतात.

हिरव्या मिरच्या खाल्ल्याने होतात पुढील फायदे

१) पचनसंस्था चांगली राहते –

हिरव्या मिरच्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. मिरच्यां मधील हे फायबर कोलोन क्लीनिंग थेरेपीसारखं काम करतं त्यामुळे अडचणीशिवाय शौचास मदत होते.

२) हिरव्या मिरच्यांमुळे वजनकमी करण्यास मदत होते –

हिरव्या मिरच्यांमध्ये कॅप्साइसिनचं प्रमाण आढळून येतं. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढण्यास आणि भूक कमी करण्यासाठी मोठी मदत होते. यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होतात आणि वजन कमी कमी होतं जातं.

३) त्वचा उजळते –

हिरव्या मिरच्यांमध्ये अँटिऑक्सिडेंट विटामिन-सी मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे शरीरातील कोलेजनची वाढ होते आणि त्वचा निरोगी राहते. हिरव्या मिरच्यांमध्ये असणाऱ्या विटामिन-ई मुळे त्वचेचं आरोग्य चांगल राहण्यास मदत मिळते. तसेच, चेहेऱ्यावरील पिंपल्स, पुरळ, डाग आणि सुरकुत्यांना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

AI च्या माध्यमातून तयार केलेले फोटो होतायत तुफान व्हायरल.

एका दिवसात राज्यात होतात ७० मुली बेपत्ता, अंबादास दानवे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version