Saturday, June 3, 2023

Latest Posts

AI च्या माध्यमातून तयार केलेले फोटो होतायत तुफान व्हायरल.

साहिद नावाचा AI (Artifical Intelligence) एंथुजियास्ट हा सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतो. आणि नेहमीच नवनवीन फोटो साहिद इंस्टाग्राम वर टाकत असतो.

साहिद नावाचा AI (Artifical Intelligence) एंथुजियास्ट हा सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतो. आणि नेहमीच नवनवीन फोटो साहिद इंस्टाग्राम वर टाकत असतो.साहिद चे सर्वच फोटो हे AI च्या माध्यमातून तयार केलेले असतात. सध्या साहिद बॉलीवूड तारकांचे AI जनरेटेड फोटो त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून शेअर करत असतो. हे फोटो जणू काही वाऱ्याच्या वेगाने सोशलमीडिया वर व्हायरल होत असताना आपण बघतले असतीलच. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून प्रचंड कॉमेंट्स चा वर्षाव होत असतो.

साहिदने आत्तापर्यंत हिंदी बॉलीवूड मच्या नायिकांना म्हणजे अगदी दीपिका पादुकोण (Deepika Padukone), कृती सेनन (Kriti Sanon), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra), कतरिना कैफ (Katrina Kaif), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) पर्यंतच्या बॉलीवूड अभिनेत्रींचे AI फोटोस तयार केले असून त्या म्हातारपणात नेमक्या कश्या दिसतील असे दर्शवले आहे. आणि या फोटोजना साहिदने कॅप्शन देखील दिल आहे. त्याचबरोबर AI चा वापर करुन बॉलिवूड अभिनेत्रींचे असे फोटो बनवले आहेत ज्यात असे दिसते कि, त्यांच्या वयाप्रमाणेच सौंदर्याची देखील वाढ होत आहे. मी हे Midjourney AI वापरून बनवले आहे.

साहिदच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी बऱ्याच मजेशीर कॉमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहेत. प्रत्येक फॅन ला आपल्या आवडत्या अभिनेत्रीच म्हातारपणातलं रूप पाहून वेगळेच कुतूहल वाटत आहे. काही नेटकऱ्यांनी साहिदनं शेअर केलेल्या फोटोचे कौतुक देखील केले आहे.साहिद हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. त्याच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. साहिदला सोशल मीडियावर 23.2K फॉलोवर्स आहेत.

हे ही वाचा : 

अखेर ठरला कर्नाटकाचा मुख्यमंत्री? या दिवशी होणार शपथविधी…

बैलगाडा शर्यतीवर लवकरच येणार नवा चित्रपट

IPL2023, पर्पल कॅपवर आणि ऑरेंज कॅपवर कोणत्या खेळाडूचे नाव कोरले जाणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss