Thursday, February 29, 2024

Latest Posts

Depression म्हणजे नेमकं काय? कोणती असतात लक्षणे ? वाचा सविस्तर…

आजच्या काळात नैराश्य (Depression) हा एक असा शब्द आहे की फर क्वचित लोकांनाच याविषयी माहिती नसेल. अनेकांनी नैराश्य हा शब्द जरी ऐकला असला तरी खऱ्या अर्थाने याचा अर्थ समजणारे फार कमी लोक आहेत.

Depression : आजच्या काळात नैराश्य (Depression) हा एक असा शब्द आहे की फर क्वचित लोकांनाच याविषयी माहिती नसेल. अनेकांनी नैराश्य हा शब्द जरी ऐकला असला तरी खऱ्या अर्थाने याचा अर्थ समजणारे फार कमी लोक आहेत. पुष्कळ लोक नैराश्यालाच दु:ख समजतात आणि गोंधळ करतात. खरंतर नैराश्यग्रस्त व्यक्तीला आपण नैराश्यात असल्याचे जाणवू लागते. मात्र, असे होत नाही. दु:ख आणि नैराश्य फार वेगळे आहे. आज आम्ही तुम्हाला नैराश्य म्हणजे काय आहे ते सांगणार आहोत.

डिप्रेशन ही एक अशी भावना आहे जी तुम्हाला अस्वस्थ करते आणि कोणत्याही कामातील तुमचे स्वारस्य काढून घेते. ही अशी स्थिती आहे जी तुम्हाला आत्महत्येच्या शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जाते. आपल्यासह काहीच ठीक होत नाही आणि आपण काहीच करू शकत नाही अथवा आपल्याबरोबर काहीच ठीक होत नाही, आपल्याला आता काहीच मिळणार नाही अशा सतत विचारांनी मन ग्रासले जाते. रोजच्या आयुष्यात एकावर एक येणारे दुःख सहन न करता येणे आणि सतत घडणाऱ्या घटनांमुळे नैराश्य येण्याची क्रिया होत राहते. प्रेमात धोका मिळणे, नोकरी गमावणे, एखादी जवळची व्यक्ती गमावणे अशा अनेक कारणांमुळे नैराश्य येऊ शखते. वेदनेच्या भावना सतत येत राहिल्या तर हे मेजर डिप्रेशनचे कारण ठरते. साधारणतः २ आठवडे हे नैराश्य टिकते आणि याच दरम्यान नैराश्य आलेल्या व्यक्तींना सांभाळावे लागते अन्यथा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल अशा व्यक्ती उचलतात.

नैराश्य हा एक मानसिक विकार आहे ज्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा त्याला सतत दु:खी वाटू लागते. मात्र, नैराश्यात असेलली व्यक्ती इतरांसमोरही स्वत:ला दु:खी दाखवते असे नाही. जर कोणी डिप्रेशनमध्ये असेल तर ती व्यक्ती हसते, लोकांशी बोलते मात्र आतून त्या व्यक्तीला एकटेपणाची पोकळी जाणवते. नैराश्यामध्ये व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागतो.

जर तुम्हाला अनेक आठवडे सतत कोणत्याही कारणाशिवाय उदास वाटत असेल तर तुम्ही नैराश्याचा बळी ठरू शकता. त्याच वेळी उदासीन व्यक्ती नेहमी वाईट मूडमध्ये आढळते, ती सतत शांत असते, एकटं राहायला आवडतं, काहीही करण्याची इच्छा होत नाही, उत्साही वाटत नाही. तसेच, व्यक्तीच्या झोपण्याच्या पद्धतींमध्ये बदल होतो. काही लोक गरजेपेक्षा जास्त झोपू लागतात. पूर्ण झोप घेतल्यानंतरही त्यांना स्वत:मध्ये ऊर्जा कमी दिसते. तसेच, काही लोक झोप घेत नाहीत. ते संपूर्ण रात्र आणि दिवसभर जागे राहतात. झोपेबरोबरच निराश व्यक्तीच्या आहारावरही परिणाम होऊ लागतो. नैराश्याने ग्रस्त व्यक्तीमध्ये ही सर्व लक्षणे दीर्घकाळ टिकून राहतात. जर ही लक्षणे तुमच्यामध्ये २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर तुम्हाला मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. मानसशास्त्रज्ञ वेगवेगशळ्या चाचण्या घेतात आणि एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे की नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचतात. डिप्रेशनवर वेळीच उपचार न मिळाल्यास, ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

हे ही वाचा : 

Rohit Sharma ला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे MI ला मोठे नुकसान तर CSK ला झाला फायदा, इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स…

धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उद्धव ठाकरे आक्रमक, काय आहे मागण्या घ्या जाणून सविस्तर माहिती…

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss