Monday, May 13, 2024

Latest Posts

“देशाची घटना बदलण्यासाठी मोदींचा ४०० पार चा नारा”; शरद पवारांचा हल्लाबोल 

"नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात त्यावर चिंता आहे."असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली.

लोकसभा निवडणुकीचे वारे सगळीकडे पसरल्याने प्रचाराला वेग आला आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी लढत अधिक रंगत होताना दिसत आहे. यातच आज बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी पुण्यातील सासवड मध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी या सभेला संबोधित करत मोदींवर घणाघाती टीका केली आहे.

“नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात त्यावर चिंता आहे.”असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi )टीका करण्यास सुरुवात केली. “देशाची घटना बदलण्यासाठी 400 पार च्या घोषणा दिल्या जात आहे. संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना 400 जागा पाहिजे आहेत. (Narendra Modi ) नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची किंमत ठेवली नाही. झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. त्यामुळे हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू.”अशा शब्दात मोदींवर ताशेरे ओढले.

ते पुढे म्हणाले की, “या लोकसभेची निवडणूक वेगळी निवडणूक आहे. हा देश कोणत्या पद्धतीने चालवायचा हा प्रश्न या निवडणुकीचा आहे. देश चालण्याचा अर्थ हा लोकशाहीच्या मार्गाने, लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने देशाचा कारभार करणे ही लोकशाहीची गरज आहे. आज काय चित्र दिसते. स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे. पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेत का? जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत का? नगर पालिकेच्या निवडणुका झाल्या का? किती दिवसांपासून या निवडणुका झाल्या नाहीत. या संस्था किती दिवसांपासून मोकळ्या आहेत.आतापर्यंत सर्व सहकार्यांनी मनापासून साथ दिली. 1967 साली मी पहिली निवडणूक लढलो.”

यंदाची निवडणूक वेगळी आहे. देश कसा चालवायचा हे यंदाच्या निवडणूकीचं उद्दिष्ट आहे. दोन वर्ष तुम्ही निवडणुका घेणार नसाल आणि येथून सुरुवात करणार असाल तर आणखी काही दिवसांनी कदाचित विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका न घेण्याची दुर्बुद्धी या सरकारला सुचू शकते, असा आरोप शरद पवारांनी यावेळी केला.

दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असे समीकरण दिसणार आहे. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत जरी असली तरी बारामतीच्या जागेवरुन “पवार” कुटुंबियात काटे की टक्कर बघायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

“शिवरायांच्या गादी पुढे मोदी कोणीच नाही”;SANJAY RAUT यांचा PM NARENDRA MODI यांच्यावर निशाणा

PM NARENDRA MODI यांची आज कोल्हापूरात तोफ धडकणार;उमेदवाराच्या प्रचारार्थ मोदींची सभा 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss