Thursday, May 16, 2024

Latest Posts

Vishal Patil करणार VBA मध्ये प्रवेश ! बंधू Pratik Patil यांनी घेतली Prakash Ambedkar यांची भेट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा सुटला असून वादग्रस्त सांगली (Sangali) आणि भिवंडीच्या (Bhiwandi) जागेबाबतही महाविकास आघाडीकडून निर्णय घेण्यात आला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाच्या चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे सांगलीतील काँग्रेस (Congress) नेते विशाल पाटील (Vishal Patil) आणि विश्वजित कदम (Vishvajeet Kadam) नाराज झाल्याच्या बातम्या येत आहेत. अश्यातच आज (बुधवार, १० एप्रिल) विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सांगली मतदारसंघातील जागा शिवसेनेला सोडल्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील नाराज असल्याचे कळत आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार अशी भूमिका विशाल पाटील यांनी घेतली आहे. त्यात आज सकाळीच प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता विशाल पाटील वंचित मध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आज सकाळी पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलेही सजेशन दिलेले नाही.” प्रकाश आंबेडकर यांनी पुढे काँग्रेसवर टीका करत . ते म्हणाले, “काँग्रेसने आधीच ठरवले पाहिजे कि त्यांना आपले अस्तित्व ठेवायचे आहे कि नाही. सांगलीमध्ये शिवसेनेची ताकद कमी आहे.” त्यामुळे, आता विशाल पाटील यांची पुढची भूमिका काय असेल हे लवकरच कळेल.

Latest Posts

Don't Miss